भारताच्या सर्वात 'वजनदार' GSAT-11 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेट स्पीडमध्ये येणार क्रांती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 08:21 AM2018-12-05T08:21:13+5:302018-12-05T08:24:11+5:30

भारताचा सर्वात वजनदार उपग्रह असलेल्या GSAT-11 चे बुधवारी रात्री यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. कम्युनिकेशन उपग्रह असलेल्या GSAT-11 मुळे भारतातील इंटरनेटचा वेग वाढणार आहे. 

Successful launch of India's most weighted GSAT-11 satellite | भारताच्या सर्वात 'वजनदार' GSAT-11 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेट स्पीडमध्ये येणार क्रांती

भारताच्या सर्वात 'वजनदार' GSAT-11 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेट स्पीडमध्ये येणार क्रांती

ठळक मुद्दे भारताचा सर्वात वजनदार उपग्रह असलेल्या GSAT-11 चे रात्री यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. युरोपियन स्पेस एजन्सी, फ्रेंच गुयाना येथून GSAT-11 ने अवकाशाकडे यशस्वी झेप घेतली. कम्युनिकेशन उपग्रह असलेल्या GSAT-11 मुळे भारतातील इंटरनेटचा वेग वाढणार आहे. या वर्षाच्या सुरुवातील जीसॅट-11 उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार होते. मात्र काही तांत्रिक त्रुटींच्या शंकेमुळे त्यावेळी या उपग्रहाचे प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आले होते.

नवी दिल्ली - भारताचा सर्वात वजनदार उपग्रह असलेल्या GSAT-11 चे रात्री यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. युरोपियन स्पेस एजन्सी, फ्रेंच गुयाना येथून GSAT-11 ने अवकाशाकडे यशस्वी झेप घेतली. कम्युनिकेशन उपग्रह असलेल्या GSAT-11 मुळे भारतातील इंटरनेटचा वेग वाढणार आहे. 

या वर्षाच्या सुरुवातील जीसॅट-11 उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार होते. मात्र काही तांत्रिक त्रुटींच्या शंकेमुळे त्यावेळी या उपग्रहाचे प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आले होते. त्यानंतर इस्त्रोने या उपग्रहाची तपासणी करण्यासाठी हा उपग्रह फ्रेंच गुयाना येथून माघारी बोलावला होता. हा निर्णय GSAT-6A या उपग्रहाचे प्रक्षेपण अपयशी ठरल्यानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून घेण्यात आला होता. 29 मार्च रोजी प्रक्षेपण केल्यानंतर GSAT-6A हा उपग्रह प्रक्षेपण केल्यानंतर काही काळाने अनियंत्रित झाला होता. तसेच त्याच्याशी असलेला संपर्क तुटला होता. त्यामुळे त्यावेळी GSAT-11 चे प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आले होते. अखेर आज या उपग्रहाने अवकाशकडे यशस्वी झेप घेतली. 

GSAT-11 हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह असून, त्याचे सोलर पॅनल सुमारे चार मीटर एवढे मोठे आहेत. कम्युनिकेशन उपग्रह असलेल्या GSAT-11 मुळे भारताती इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. 



GSAT-11 उपग्रहाची काही खास वैशिष्ट्ये 

1 - GSAT-11  हा उपग्रह इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने क्रांतिकारक ठरणार आहे. या उपग्रहामुळे इंटरनेटचा स्पीड वाढेल. तसेच या उपग्रहाद्वारे सेकंदाला 100 गीगाबाईटपेक्षा अधिक ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी मिळेल.

2 - GSAT-11 या उपग्रहात 40 ट्रान्सपाँडर कू-बँड आणि का-बँड फ्रिक्वेंसीमध्ये आहेत. त्यामाध्यमातून हाय बँडविथ कनेक्टिव्हिटी 14 गिगाबाईट सेकंद डेटा ट्रान्सफर स्पीड देता येणे शक्य आहे. 

3 - GSAT-11 चे खास वैशिष्ट्य म्हणजे हा उपग्रह बीम्सचा अनेकवेळा वापर करण्यास सक्षम आहे. त्यामुळे देशाच्या संपूर्ण क्षेत्रफळाला कव्हर करणे त्याला शक्य होईल. 

4 - GSAT-11 मध्ये चार उच्च क्षमतेचे थ्रोपुट सॅटेलाइट आहेत. ते पुढील वर्षीपासून देशात प्रत्येक सेकंदाला 100 गीगाबाईटहून अधिक ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देतील.  ग्रामीण भागातील इंटरनेट क्रांतीच्या दृष्टीने हा उपग्रह मैलाचा दगड ठरेल.  


Web Title: Successful launch of India's most weighted GSAT-11 satellite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.