डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची पुन्हा विटंबना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 06:29 PM2018-03-31T18:29:41+5:302018-03-31T18:32:45+5:30

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत दोषींना अटक करण्याची मागणी केली.

Statue of BR Ambedkar vandalised by miscreants in UP | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची पुन्हा विटंबना

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची पुन्हा विटंबना

googlenewsNext

अलाहाबाद: उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद येथील त्रिवेणीपुरम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. आज सकाळी ही घटना स्थानिकांच्या लक्षात आली. त्यानंतर या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत दोषींना अटक करण्याची मागणी केली. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात महत्त्वाचा बदल करण्याच्या सूचना उत्तर प्रदेश सरकारने नुकत्याच दिल्या होत्या. यावरून आता उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापले आहे. ‘व्होट बँके’साठी सरकार बाबासाहेबांना ‘रामजी’ बनवण्याकडे लक्ष देत आहे. पण त्यांच्या जातीच्या लोकांसाठी काम करण्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे, असा आरोप बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती यांनी केली. भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ मागास जाती आणि आदिवासींवर होत असलेल्या अत्याचाराकडे लक्ष देत नाही. त्यांना मतपेटीची चिंता लागली आहे. त्यासाठी त्यांचा संपूर्ण भर हा नाव बदलण्यावर असल्याची टीकाही मायावती यांनी केली.
 

Web Title: Statue of BR Ambedkar vandalised by miscreants in UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.