हिंदुस्थान हिंदूंबरोबच इतर धर्मीयांचाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 05:06 PM2017-10-28T17:06:47+5:302017-10-28T17:09:57+5:30

हिंदुस्थान हा फक्त हिंदू धर्मीय लोकांचा देश नाही तर इतर धर्मीय लोकांचाही देश आहे.

Statements of other religions, with reference to Hindus, Hindus | हिंदुस्थान हिंदूंबरोबच इतर धर्मीयांचाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य

हिंदुस्थान हिंदूंबरोबच इतर धर्मीयांचाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य

Next
ठळक मुद्देहिंदुस्थान हा फक्त हिंदू धर्मीय लोकांचा देश नाही तर इतर धर्मीय लोकांचाही देश आहे. ज्याप्रमाणे जर्मन लोकांचा देश जर्मनी आहे, ब्रिटिशांचा देश ब्रिटन आहे, अमेरिकन नागरिकांचा देश अमेरिका त्याचप्रमाणे हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे. पण हा देश फक्त हिंदूंचा नाही तर इतर धर्मीयांचाही आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य.

इंदूर- हिंदुस्थान हा फक्त हिंदू धर्मीय लोकांचा देश नाही तर इतर धर्मीय लोकांचाही देश आहे. ज्याप्रमाणे जर्मन लोकांचा देश जर्मनी आहे, ब्रिटिशांचा देश ब्रिटन आहे, अमेरिकन नागरिकांचा देश अमेरिका त्याचप्रमाणे हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे. पण हा देश फक्त हिंदूंचा नाही तर इतर धर्मीयांचाही आहे, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. शुक्रवारी इंदूरमधील एका महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं आहे. 
कुठलाही एक नेता किंवा एक पक्ष देशाला महान बनवू शकत नाही, तर त्यासाठी समाजाचं मोठं योगदान असावं लागलं, असंही मोहन भागवत यांनी म्हटलं.

पूर्वी काहीही समस्या जाणवू लागल्यावर लोक देवाकडे साकडं घालायचे किंवा देवाला दोष द्यायचे. सध्या कलियुग आहे त्यावेळी लोक सरकारला दोष देतात. पण सरकारला जेव्हा समाजाची योग्य साथ मिळते तेव्हाच सरकारला लोकांच्या समस्या निवारण्याचं काम योग्यपणे करता येतं, असंही मोहन भागवत यांनी म्हंटलं आहे. 

जेव्हा समाज बदलतो तेव्हा सरकारवरही त्याचा परिणाम बघायला मिळतो. सरकारी यंत्रणांमध्येही बदल बघायला मिळतात. भारतामध्ये जगातील महासत्ता होण्याची क्षमता आहे. महासत्ता व्हायचं असेल तर जनतेला आपल्या डोक्यातून आणि मनातून भेदभाव हा शब्द कायमचा खोडून टाकावा लागेल, असंही मोहन भागवत यांनी यावेळी म्हंटलं आहे. 

Web Title: Statements of other religions, with reference to Hindus, Hindus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.