श्रीदेवीचा अपघात नव्हे, खून झाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 05:31 AM2019-07-13T05:31:11+5:302019-07-13T05:31:28+5:30

आयपीएस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

Sridevi was not killed, but she was murdered! | श्रीदेवीचा अपघात नव्हे, खून झाला!

श्रीदेवीचा अपघात नव्हे, खून झाला!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जगभरातील सिनेप्रेमींना धक्का देऊन गेलेली बॉलिवूडची चांदनी, अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू हा अपघात नसून खून होता, असा खळबळजनक दावा केरळचे डीजीपी आणि आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंग यांनी केला आहे. डॉ. उमादथन या मित्राच्या हवाल्याने त्यांनी हा दावा केला. ऋषिराज यांचे मित्र डॉ. उमादथन एक नावाजलेले फॉरेन्सिक सर्जन होते. अलीकडे त्यांचे निधन झाले.


डॉ. उमादथन हे गंभीर गुन्हे विशेषत: मर्डर मिस्ट्री उलगडण्यात ‘उस्ताद’ मानले जात. केरळ पोलीसही कुठल्याही हत्या प्रकरणाचा गुंता सोडवता आला नाही की, डॉ. उमादथन यांना बोलवत. फॉरेन्सिक तज्ञ असलेल्या डॉ. उमादथन यांनी अशा प्रकारे अनेक हत्या प्रकरणांची उकल केली होती. त्यांच्याच हवाल्याने ऋषिराज सिंग यांनी श्रीदेवींचा मृत्यू हा एक खून होता, असा दावा केला आहे.


यूएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. ऋषिराज यांनी म्हटले की, मी जिज्ञासेपोटी एकदा माझे मित्र डॉ. उमादथन यांना श्रीदेवीच्या मृत्यूबद्दल विचारले होते. पण त्यांच्या उत्तराने मी हादरून गेलो. मी हे संपूर्ण प्रकरण जवळून पाहिले, असे त्यांनी मला सांगितले होते. यादरम्यान श्रीदेवीचा मृत्यू हा अपघात नाही, अशा अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. डॉ. उमादथन यांनी या प्रकरणाचा बारकाईने अभ्यास केला होता. त्यातून हा खून आहे, असे अनेक पुरावे मिळाले होते.


डीजीपी ऋषिराज यांनी डॉ. उमादथन यांच्या निधनानंतर त्यांच्यावर एक लेख लिहिला होता. या लेखात डॉ. उमादथन यांनी सोडवलेल्या अनेक मर्डर मिस्ट्रींचा उल्लेख केला होता. याच लेखात एका कोपºयात श्रीदेवींच्या मृत्यूबाबत त्यांनी दिलेल्या निष्कषार्चाही उल्लेख होता.
बाथटबमध्ये मृत्यू कसा काय होऊ शकतो?
कुठलीही व्यक्ती नशेत असली तरी केवळ एक फूट खोल पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये तिचा मृत्यू होऊ शकत नाही, असे डॉ. उमादथन यांनी म्हटल्याचे ऋषिराज यांनी आपल्या लेखात नमूद केले होते. दुबईतील जुमेरा एमिरेट्स टॉवर्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये गतवर्षी २४ फेब्रुवारीच्या रात्री श्रीदेवीचा मृत्यू झाला होता.

Web Title: Sridevi was not killed, but she was murdered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.