गर्भधारणेसाठी पतीऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचे शुक्राणू, डॉक्टरांना ठोठावला दीड कोटीचा दंड 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 06:48 AM2023-06-27T06:48:58+5:302023-06-27T06:49:50+5:30

Crime News: एका महिलेला गर्भधारणा होण्यासाठी तिच्या पतीऐवजी वेगळ्याच व्यक्तीच्या शुक्राणूंचा डॉक्टरांनी उपयोग केला होता. याप्रकरणी दिल्लीतील एक खासगी रुग्णालय व संबंधित डॉक्टरांना राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने दीड कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Sperm of another person instead of husband for pregnancy, doctor fined 1.5 crores | गर्भधारणेसाठी पतीऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचे शुक्राणू, डॉक्टरांना ठोठावला दीड कोटीचा दंड 

गर्भधारणेसाठी पतीऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचे शुक्राणू, डॉक्टरांना ठोठावला दीड कोटीचा दंड 

googlenewsNext

नवी दिल्ली : एका महिलेला गर्भधारणा होण्यासाठी तिच्या पतीऐवजी वेगळ्याच व्यक्तीच्या शुक्राणूंचा डॉक्टरांनी उपयोग केला होता. याप्रकरणी दिल्लीतील एक खासगी रुग्णालय व संबंधित डॉक्टरांना राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने दीड कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

गेल्या काही वर्षांत अनैतिक पद्धतींचा अवलंब करून उपचार झाल्याच्या अनेक घटना उजेडात आल्या आहेत. २००९ मध्ये एका महिलेने एटीआर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जुळ्या मुलांना जन्म दिला. पालकांकडून मुलांकडे अनुवांशिकरीत्या जे रक्तगट संक्रमित होतात, त्यापेक्षा या मुलांचे रक्तगट निराळे होते. तसेच, या महिलेचा पती सदर मुलांचा जैविक पिता नाही हे त्यांच्या डीएनए प्रोफाइलवरून स्पष्ट झाले. डॉक्टरांनी केलेली लबाडी लक्षात आल्यानंतर पती-पत्नीने दोन कोटी रुपये नुकसान भरपाईचा दावा राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे दाखल केला.

डॉक्टरांनी पतीऐवजी वेगळ्याच व्यक्तीचे शुक्राणू गर्भधारणेसाठी उपयोगात आणल्याचे  कळल्यानंतर महिलेवर झालेला भावनिक आघात, त्यामुळे निर्माण झालेला कुटुंबकलह अशा काही गोष्टी आयोगासमोर दाखल  केलेल्या याचिकेत नमूद करण्यात आल्या होत्या.

Web Title: Sperm of another person instead of husband for pregnancy, doctor fined 1.5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.