दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींचा नरेंद्र मोदींसोबत मेट्रोने प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 06:51 PM2018-07-09T18:51:17+5:302018-07-09T18:57:39+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांनी नोएडामध्ये सॅमसंग या मोबाइल कंपनीच्या प्लॅन्टचे उद्धाटन केले. यावेळी त्यांनी दिल्ली ते नोएडा दरम्यानचा प्रवास मेट्रोने केला.  

South Korean President metro travels with Narendra Modi | दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींचा नरेंद्र मोदींसोबत मेट्रोने प्रवास 

दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींचा नरेंद्र मोदींसोबत मेट्रोने प्रवास 

googlenewsNext
ठळक मुद्देनोएडामध्ये सॅमसंग या मोबाइल कंपनीच्या प्लॅन्टचे उद्धाटनदिल्ली ते नोएडा दरम्यानचा प्रवास मेट्रोने20 हजार रोजगार मिळणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांनी नोएडामध्ये सॅमसंग या मोबाइल कंपनीच्या प्लॅन्टचे उद्धाटन केले. यावेळी त्यांनी दिल्ली ते नोएडा दरम्यानचा प्रवास मेट्रोने केला.  

नरेंद्र मोदी आणि मून जे इन यांनी मेट्रोतून प्रवास केला. यावेळी त्यांनी मेट्रोतील लोकांशी गप्पा मारल्या. यानंतर नोएडा येथे पोहचल्यानंतर दोघांनी गांधी स्मृतिस्थळाला भेट दिली. तसेच, याठिकाणी मून जे इन यांनी महात्मा गांधी यांच्या आवडीचे भजन सुद्धा ऐकले. नोएडा सेक्टर 81मध्ये सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स प्लॅन्टचे उद्घाटन करण्यात आले. या प्लॅन्टच्या माध्यमातून जवळपास 20 हजार रोजगार मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 



 



 


गेल्या काही वर्षात मोबाइल निर्मितीच्या कंपन्यांची संख्या वाढून 120 झाली. त्यामध्ये जवळपास 50 फक्त नोएडामध्ये आहेत. या माध्यमातून देशातील तरुणांना रोजगार मिळत आहे. भारतात आज 40 कोटी स्मार्टफोनचा उपयोग करण्यात येत आहे. यामुळे ऑनलाइन व्यवहाराला चालना मिळाली आहे, असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. 



 




      
दरम्यान, दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन चार दिवसांच्या भारत दौ-यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले होते. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान 1973 पासून द्विपक्षीय संबंध आहेत.

Web Title: South Korean President metro travels with Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.