'आमच्या कार्यालयात कुणी लिफाफा सोडून गेलं,  बघितलं तर ₹10 कोटींचे बॉन्ड'; जदयूनं निवडणूक आयोगाला सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 09:01 AM2024-03-18T09:01:33+5:302024-03-18T09:02:22+5:30

बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जदयूने इलेक्शन कमीशनकडे केलेल्या फायलिंगनुसार, त्यांना एकूण 24 कोटी रुपयांहून अधिकचे इलेक्टोरल बॉन्ड मिळाल्याचे समजते

'Someone left an envelope in our office, found a bond of ₹10 crore', JD(U) told Election Commission | 'आमच्या कार्यालयात कुणी लिफाफा सोडून गेलं,  बघितलं तर ₹10 कोटींचे बॉन्ड'; जदयूनं निवडणूक आयोगाला सांगितलं

'आमच्या कार्यालयात कुणी लिफाफा सोडून गेलं,  बघितलं तर ₹10 कोटींचे बॉन्ड'; जदयूनं निवडणूक आयोगाला सांगितलं

सध्या संपूर्ण देशभरात इलेक्टोरल बॉन्ड संदर्भात जबरदस्त चर्चा सुरू आहे. यातच आता, 2019 मध्ये कुणीतरी आपल्या कार्यालयात 10 कोटी रुपयांच्या इलेक्टोरल बॉन्डसह एक लिफाफा दिला होता. मात्र दान देणाऱ्यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती मिळू शकलेली नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (यूनायटेड)ने निवडणूक आयोगाला सांगितले आहे. निवडणूक आयोगाने रविवारी विविध राजकीय पक्षांनी सादर केलेल्या शेकडो सीलबंद लिफाफ्यांची माहिती सार्वजनिक केली आहे. बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जदयूने इलेक्शन कमीशनकडे केलेल्या फायलिंगनुसार, त्यांना एकूण 24 कोटी रुपयांहून अधिकचे इलेक्टोरल बॉन्ड मिळाल्याचे समजते.
  
आपल्याला भारती एअरटेल आणि श्री सीमेंटकडून अनुक्रमे 1 कोटी रुपये आणि 2 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड मिळाले असल्याची माहिती जदयूने निवडणूक आयोगाला दिली आहे. तसेच, आणखी एका फायलिंगमध्ये, जेडीयूने इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमाने एकूण 24.4 कोटी रुपयांच्या निधीसंदर्भातही माहिती दिली आहे. पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मिळालेल्या इलेक्टोरल बॉन्डमध्ये बरेच हैदराबाद आणि कोलकात्यातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखांमधून जारी झाले आहेत आणि काही पाटण्यातील एसबीआय ब्रांचमधूनही जारी झाले आहेत.

आमच्या कार्यालयात लिफाफा आलाः जेडीयू -
यातत जेडीयूच्या बिहार कार्यालयाने निवडणूक आयोगाकडे अत्यंत मनोरंजक फायलिंग केली होती. यात, पाटणा येथील जेडीयूच्या कार्यालयात 3 एप्रिल 2019 रोजी 10 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड आले. मात्र ही देणगी नेमकी कुणी दिली, यासंदर्भात पक्षाकडे कसल्याही प्रकारची माहिती नाही. तसेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्नही केला नाही. कारण त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा असा कुठलाही आदेश नव्हता. 'कुणी व्यक्ती 03-04-2019 रोजी पटणा येथील आमच्या कार्यालयात आली आणि एक सीलबंद लिफाफा दिला. हा लिफाफा आम्ही जेव्हा उघडला, तेव्हा त्यात आम्हाला 1 कोटी रुपयांचे 10 इलेक्टोरल बॉन्ड मिळाले,' असे जदयूने निवडणूक आयोगाला सांगितेल. 

जेडीयूने म्हटले आहे की, 'भारत सरकारच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार, आम्ही पाटण्यातील एसबीआय शाखेत खाते उघडले आणि इलेक्टोरल बॉन्ड जमा केले. याचे पैसे आमच्या पक्षाच्या खात्यात 10-04-2019 रोजी जमा करण्यात आले. परिस्थिती पाहता, आम्ही देणगीदारांसंदर्भात अधिक माहिती देण्यास असमर्थ आहोत.
 
समाजवादी पक्षाला 10 कोटी रुपये... -
याशिवाय, समाजवादी पक्षानेही निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीत, आपल्याला डाककडून 10 बॉन्ड मिळाले होते, याचे मूल्य 10 कोटी रुपये. मात्र ही देणगी कुणी दिली, यासंदर्भात  कसल्याही प्रकारची माहिती नाही, असे म्हटले आहे. तसेच आपल्याला, एसके ट्रेडर्स, सॅन बेव्हरेजेस, एके ट्रेडर्स, केएस ट्रेडर्स, बीजी ट्रेडर्स आणि एएस ट्रेडर्स कडून इलेक्टोरल बाँड्सद्वारे देणग्या प्राप्त झाल्या, अशेही पक्षाने म्हटले आहे.
 

Web Title: 'Someone left an envelope in our office, found a bond of ₹10 crore', JD(U) told Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.