सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुण घोड्यावरून ऑफिसला जातो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 03:42 PM2018-06-16T15:42:50+5:302018-06-16T16:02:01+5:30

ट्रॅफिकला कंटाळून बंगळुरु येथील सॉफ्टवेअर इंजिनीअर रुपेश कुमार वर्मा याने आपल्या घरापासून ते ऑफिसपर्यंत घोड्यावरुन सवारी केली. रुपेश कुमार वर्मा याने घोड्यावरुन केलेली सवारी सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. 

software engineer goes to the office from a young horse | सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुण घोड्यावरून ऑफिसला जातो तेव्हा...

सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुण घोड्यावरून ऑफिसला जातो तेव्हा...

Next
ठळक मुद्देघरापासून ते ऑफिसपर्यंत घोड्यावरुन सवारी सोशल मीडियात चर्चेचा विषयप्राणी प्रेमी असून लोकांना शाकाहारी होण्यासाठी प्रोत्साहन

बंगळुरु : शहरातील ट्रॅफिकच्या चक्रव्यूहातून वाहने आणि लोक मार्ग काढत असताना आपण नेहमीच पाहतो. अनेकदा तासनतास गाडी जागेवरुन हलतही नसल्याने  चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागतो. अशाच ट्रॅफिकला कंटाळून बंगळुरु येथील सॉफ्टवेअर इंजिनीअर रुपेश कुमार वर्मा याने आपल्या घरापासून ते ऑफिसपर्यंत घोड्यावरुन सवारी केली. रुपेश कुमार वर्मा याने घोड्यावरुन केलेली सवारी सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. 
रुपेश कुमार वर्मा याचा ऑफिसमधील शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी ऑफिसला जाण्यासाठी त्याने घोड्यावरुन जाण्याचा निर्णय घेतला. घोड्यावरुन प्रवास करताना त्याच्या हातात ऑफिसची बॅग होती आणि एक पाटी लावली होती. त्या पाटीवर असे लिहिले होते की, सॉफ्टवेअर इंजिनिअरींग म्हणून काम करण्याचा माझा शेवटचा दिवस आहे. (Last working day as a software engineer\m/) 
मी एका मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे. सोशल मीडियात अशाप्रकारे माझ्याकडे पाहिले जाईल, अशी माझी अपेक्षा नव्हती, असे रुपेश कुमार वर्मा याने सांगितले. तसेच, गेल्या आठ वर्षांपासून मी बंगळुरुमध्ये राहत आहे. येथील प्रदुषणाला कंटाळलो असून शहरात मोठ्याप्रमाणात ट्रॅफिक वाढत आहे. मी प्राणी प्रेमी असून लोकांना शाकाहारी होण्यासाठी प्रोत्साहन करत आहे, असेही रुपेश कुमार म्हणाला.



 

मुंबईच्या ट्रॅफिकला शाहरूख खान सुद्धा कंटाळला होता...
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये प्रचंड व्यस्त असतो. या अनेक चित्रपटांचे सेट मुंबईबाहेर असल्यामुळे शाहरूखला बरीच कसरत करावी लागत असते. मुंबईतील ट्रॅफिकमुळे या सेटपर्यंत पोहोचेपर्यंत शाहरूखला अक्षरश: नाकीनऊ येत असल्याने त्याने कंटाळून हेलिकॉप्टरने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. 

Web Title: software engineer goes to the office from a young horse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.