... त्यामुळे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा होतो 'शिक्षक दिन'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 09:18 AM2018-09-05T09:18:45+5:302018-09-05T09:20:22+5:30

आई आणि वडिलांनंतर प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात महत्वाचे स्थान असते ते गुरुंना म्हणजेच शिक्षकांना. अगदी बालवाडीच्या शाळेपासून ते कॉलेज आणि त्यानंतरच्या जीवनातही प्रत्येक पावलावर आपणास शिक्षक भेटतो.

... so Dr. 'Teacher's Day' is celebrated on the birthday of Sarvepalli Radhakrishnan | ... त्यामुळे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा होतो 'शिक्षक दिन'

... त्यामुळे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा होतो 'शिक्षक दिन'

Next

मुंबई - देशभरात 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मात्र, 5 सप्टेंबर या दिनीच शिक्षक दिन का साजरा केला जातो, असा प्रश्न अनेकांना पडतो. तर, देशाची माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन असल्यामुळे हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी विद्यार्थ्यांकडून गुरुंचे वंदन करुन, त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला जातो.

आई आणि वडिलांनंतर प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात महत्वाचे स्थान असते ते गुरुंना म्हणजेच शिक्षकांना. अगदी बालवाडीच्या शाळेपासून ते कॉलेज आणि त्यानंतरच्या जीवनातही प्रत्येक पावलावर आपणास शिक्षक भेटतो. माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो, त्यामुळे जीवनात प्रत्येक वळणावर आपणास नवीन शिक्षक भेटतात. आपल्या आयुष्यातील अडचणी सोडविण्यात आणि यशाचा मार्ग दाखविण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा राहतो. त्यामुळेच शिक्षकांप्रती या दिनी कृतज्ञता व्यक्त केली जाते.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. कारण, 'हे  विश्वच माझी शाळा' असे राधाकृष्णन म्हणत असत. एकदा राधा कृष्णन यांचे काही शिष्य त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्याकडे गेले. त्यावेळी, माझा जन्मदिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याऐवजी तो शिक्षक दिन म्हणून साजरा केल्यास मला अभिमान वाटेल, असे राधाकृष्णन यांनी म्हटले. तेव्हापासून 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होऊ लागला. 5 सप्टेंबर 1962 मध्ये सर्वप्रथम शिक्षक दिन साजरा करण्यात आला होता. त्यावेळी राधाकृष्णन हे देशाचे राष्ट्रपती होते. 

आंध्र प्रदेशच्या तिरुतनी शहरातील तेलुगु कुटुंबात 1982 साली राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता. आपल्या मुलाने धर्मगुरू व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र, नियतीला काही वेगळच हवं होता. त्यानुसार, आपल्या मेहनतीच्या जोरावर ते तिरुपती आणि वेल्हूर येथून शिक्षकाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर, मद्रास येथील एका ख्रिश्चन महाविद्यालयात त्यांनी तत्वज्ञान विषयाच्या अध्ययनाचे काम केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी तत्वज्ञान विषयात पदवी घेतली असून त्यांनी 'द फिलॉसॉफी ऑफ रविंद्रनाथ टागोर' या नावाने पुस्तक लिहिले आहे. 
 

Web Title: ... so Dr. 'Teacher's Day' is celebrated on the birthday of Sarvepalli Radhakrishnan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.