भाजपाला परिस्थिती अनुकूल नाही! - ओमर अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 04:34 AM2018-12-25T04:34:18+5:302018-12-25T04:34:55+5:30

भाजपाचा आपण अजिंक्य असल्याचा दावा आता चालणार नाही. देशातील वातावरण आता बदलले असून भाजपाला राममंदिराचे प्रेम हे निवडणुका जिंकण्यात जेवढे असते तेवढेच आहे

situation is not favorable for the  BJP ! - Omar Abdullah | भाजपाला परिस्थिती अनुकूल नाही! - ओमर अब्दुल्ला

भाजपाला परिस्थिती अनुकूल नाही! - ओमर अब्दुल्ला

Next

भाजपाचा आपण अजिंक्य असल्याचा दावा आता चालणार नाही. देशातील वातावरण आता बदलले असून भाजपाला राममंदिराचे प्रेम हे निवडणुका जिंकण्यात जेवढे असते तेवढेच आहे, असे जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले. अब्दुल्ला म्हणाले, गेल्या साडेचार वर्षांत काही केले नाही तर आताही काही होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना तुमच्या बँक खात्यात लाखो रूपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, तसे झाले नाही. या परिस्थितीत भाजपाने आणखी आश्वासने दिली तरी लोकांना वाटेल आमची फसवणूक होतेय. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करतात व मोदींच्या भाषणांकडे लोक ओढले जातात. परंतु, यंदा वातावरण भाजपाच्या बाजूने नाही हे सिद्ध झाले आहे.
राहुल गांधींची उंची वाढली
मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड निवडणूक निकालानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची राजकीय उंची वाढली आहे, असे सांगून अब्दुल्ला देशाचे राजकारण आणि प्रादेशिक पक्षांचे आव्हान यावर चर्चेत म्हणाले, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची महत्त्वाची भूमिका असेल व काँग्रेसला त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. ज्या राज्यांत प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व आहे तेथे काँग्रेसला त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. ज्या राज्यांत भाजपाशी काँग्रेसची थेट लढत आहे तेथे इतर पक्षांना त्याला सोबत घेण्यास आक्षेप असण्याचे कारण नाही.
अब्दुल्ला म्हणाले, २०१४ नंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये परिस्थिती फारच बिघडली आहे. मोदी यांनी लवकर निवडणुका घ्याव्यात. तीन राज्यात झालेल्या पराभवामुळे भीतीतून निवडणुका न घेण्यासाठी राज्यपालांवर भाजपा दबाब आणू शकतो, अशी आम्हाला भीती आहे. लोकशाहीत लोकांवर विश्वास ठेवून सरकार बनवण्याची संधी दिली पाहिजे व जे सरकार येईल त्याला काम करण्याची संधी द्यायला हवी. सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत सहा महिन्यांची मुदत ठेवली आहे. पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाव्यात.
जम्मू आणि काश्मीरमध्ये त्यांना सरकार स्थापन करण्याची संधी न मिळाल्याबद्दल अब्दुल्ला यांनी खेद व्यक्त केला. राज्यपालांना मी तीन पक्षांच्या पाठिंब्याची चिठ्ठी पाठवली. परंतु, राजभवनमध्ये फॅक्स मशीन नसल्यामुळे असे होऊ शकले नाही. आमचे नोंदणीकृत तीन पक्ष होते. एकाकडे २९, दुसऱ्याकडे १५ व तिसºयाकडे १२ सदस्य होते. हे तिघे मिळून आम्ही बहुमताच्या संख्येपेक्षाही पुढे होतो तरी आम्हाला नकार मिळाला. कारण होते की, आमचे राजकीय विचार समान नाहीत. एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करणाºयांचे राजकीय विचार एकसारखे आहेत की नाही हे पाहणे राज्यपालांचे काम नाही. हाच जर कायदा असेल तर बिहारमध्ये एकमेकांविरुद्ध लढलेल्या भाजपा व जनता दल (संयुक्त) आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये एकमेकांविरुद्ध लढलेल्या भाजपा व पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष यांचेही सरकार यायला नको होते. बहुमत तर विधानसभेत सिद्ध करायचे असते. राज्यपालांचे काम एवढेच असते की, पक्षाकडे आवश्यक तेवढे संख्याबळ आहे की नाही हे पाहायचे.
काश्मिरी पंडित खोºयात परतल्याशिवाय जम्मू आणि काश्मीर अपूर्ण आहे. ते परत येतील, असे वातावरण बनवणे हे सगळ्यांचे कर्तव्य आहे. आम्ही त्यासाठी बरेच प्रयत्न केले. दुर्दैवाने २०१४ नंतर खोºयातील वातावरण फारच वाईट झाले. पंडितांनी मनमोकळेपणे यावे. शेते घ्यावीत. दहशतवादाच्या आधी लोक जसे एक राहायचे तसे वातावरण बनावे.
भारताचा विश्वास जिंकावा
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे मला माहीत नाहीत. त्यांचा पक्षही नवा आहे. खान यांना काही करून दाखवावे लागेल. खान हे लष्कराने त्या पदावर बसवलेले पंतप्रधान असून त्याच्याच सांगण्यावर ते चालतात अशी आमच्या देशात शंका आहे. या वातावरणात परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना काही पावले उचलावी लागतील. भारतात हल्ला करणारे पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरावेत हे योग्य नाही. आतापर्यंत आम्हाला धोकाच झाला असून आम्ही जेव्हा एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा चार पावले आम्हाला मागे पडावे लागले आहे. दोन्ही देशांच्या सरकारांना हे लक्षात घ्यावे लागेल की, आपण मित्र बदलू शकतो. परंतु, शेजारी नाही. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी प्रशंसा केली.
 शब्दांकन : नितीन अग्रवाल
मुलाखत : सौरभ शर्मा

Web Title: situation is not favorable for the  BJP ! - Omar Abdullah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.