VIDEO : भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांच्यावर बूट फेकला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 02:48 PM2019-04-18T14:48:44+5:302019-04-18T15:03:07+5:30

भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांच्या दिशेने बूट फेकल्याची घटना समोर आली आहे. 

Shoe hurled at BJP Spokesperson Narasimha Rao during press conference | VIDEO : भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांच्यावर बूट फेकला

VIDEO : भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांच्यावर बूट फेकला

Next

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्राला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असतानाच आता भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांच्या दिशेने बूट फेकल्याची घटना समोर आली आहे. 

भोपाळ मतदार संघातून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपा मुख्यालयात जीव्हीएल नरसिम्हा राव आणि भूपेंद्र यादव यांची पत्रकार परिषद सुरु होती. यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित एका संशयिताने जीव्हीएल नरसिम्हा राव यांच्यावर बूट फेकला. यावेळी सुदैवाने नरसिम्हा राव थोडक्यात बचावले. 


दरम्यान, भाजपा मुख्यालयातील सुरक्षा रक्षकांनी त्या संशयित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तसेच, बूट फेकणारी संशयित व्यक्तीचे नाव गोपाल भार्गव असून कानपूरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. राजकीय नेत्यांवर पत्रकार परिषदेत बूट किंवा चप्पल फेकण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी सुद्धा अशाप्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत.

Web Title: Shoe hurled at BJP Spokesperson Narasimha Rao during press conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.