धक्कादायक; व्हॉट्सअॅप ग्रूपचा 'डीपी' बदलला म्हणून बेदम मारहाण करून तरुणाची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 01:01 PM2018-06-05T13:01:46+5:302018-06-05T13:02:14+5:30

व्हॉट्सअॅप ग्रुपचा प्रोफाईल फोटो बदलला म्हणून तरुणाला बेदाम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे.

Shocking As the whatsapp group changed its 'DP', he was assassinated by assassination and assassinated | धक्कादायक; व्हॉट्सअॅप ग्रूपचा 'डीपी' बदलला म्हणून बेदम मारहाण करून तरुणाची हत्या 

धक्कादायक; व्हॉट्सअॅप ग्रूपचा 'डीपी' बदलला म्हणून बेदम मारहाण करून तरुणाची हत्या 

Next

सोनीपत - व्हॉट्सअॅप ग्रुपचा प्रोफाईल फोटो बदलला म्हणून तरुणाला बेदाम मारहाण करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हरियाणातील सोनीपतमध्ये ही घटना घडली आहे.  मृत्यू झालेल्या तरुणाने ग्रुपचा प्रोफाईल फोटो बदल्यानंतर ग्रुपमधील सदस्यांनी त्याला विरोध केला. तो फोटो इतरांना आवडला नाही. ग्रुपमधील सदस्यांनी त्याला बोलवूण बेदाम मारहाण करत हत्या करण्यात आली. एका कुटुंबातील आठ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.  मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव लव जौहर असे आहे. लव जौहरचा भाऊ अजयने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जौहार कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रूपवर रविवारी रात्री तरुणांमध्ये शाब्दिक वाद सुरु होता. त्याचवेळी ग्रुपमधील एकाने प्रोफाईल फोटो बदलला. त्यावर दुसऱ्या सदस्यांनी आक्षेप घेतला. एका सदस्याने तर त्याला ग्रुपमधून काढून टाकण्याची मागणी केली. मुख्य आरोपी असलेल्या दिनेश उर्फ बंटीने लव जौहरला ग्रुपमधून बाहेर काढले होते. त्यानंतर ग्रुप फोटो बदलून त्याला पुन्हा ग्रुपमध्ये सामाविष्ठ केले. दिनेश उर्फ बंटीसह अन्य सदस्यांनी प्रोफाईल फोटो हटवल्यास पार्टी देण्याचे आमिष दाखवत बाहेर बोलवून तरुणाला बेदाम मारहाण केली. या मारहाणीत लव या तरुणाचा मृत्यू झाला.

Web Title: Shocking As the whatsapp group changed its 'DP', he was assassinated by assassination and assassinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.