धक्कादायक! मुलगी सुंदर नाही म्हणून वडिलांनीच उचललं 'हे' पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2018 10:25 AM2018-06-02T10:25:50+5:302018-06-02T10:25:50+5:30

मुलगी सुंदर नाही म्हणून वडील दुःखी होते.

Shocking The step taken by the father as the daughter was not beautiful | धक्कादायक! मुलगी सुंदर नाही म्हणून वडिलांनीच उचललं 'हे' पाऊल

धक्कादायक! मुलगी सुंदर नाही म्हणून वडिलांनीच उचललं 'हे' पाऊल

नोएडा- मुलगी सुंदर नाही म्हणून वडिलांनीच तिचं अपहरण करून नंतर मुलगी हरविल्याची तक्रार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. मुलगी सुंदर नाही म्हणून वडील दुःखी होते. तिच्यावर होणाऱ्या खर्चापासून स्वतःला वाचविण्यासाठी त्यांनी तिचं अपहरण करून एका अज्ञात स्थळी नेऊन सोडलं. इतकंच नाही, तर तिला सोडून आल्यावर त्यांनी मुलगी हरविल्याची तक्रारही दाखल केली. आरोपी व्यक्तीची ही सावत्र मुलगी आहे. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी मुलीला गाझियाबादमधून ताब्यात घेतलं तसंच मुलीच्या सावत्र वडिलांना अटक केली. 

पोलीस अधिकारी अमित किशोर श्रीवास्तव यांनी सांगितलं की, लखीमपूर खीरीमधील पीडित मुलीची आई सीमाचा घटस्फोट झाला आहे.  अडीच महिन्याआधी तिने लोकेंद्र नावाच्या व्यक्तीशी दुसरं लग्न केलं. लोकेंद्र प्रॉपर्टी डिलिंग, किसान क्रेडिट कार्डसारखी लहान-मोठी कामं करतो. लग्नानंतर लोकेंद्र सीमा व तिच्या नऊ वर्षाच्या मुलीबरोबर सेक्टर 36मध्ये राहतो आहे. गुरूवारी संध्याकाळी लोकेंद्रने मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. मुलगी क्लासला गेली पण तेथून परतली नाही, अशी तक्रार त्याने दाखल केली. पोलिसांनी चौकशीदरम्यान लोकेंद्रचा मोबाइल तपासल्यावर त्यांना संशय आला. सखोल चौकशी केल्यावर स्वतःच मुलीचं अपहरण केल्याची कबुली त्याने दिली. 

पीडित मुलीची आई सीमाने दिलेल्या माहितीनुसार, लोकेंद्रने लग्नानंतर मुलीचा सांभाळ करणार असल्याचं वचन दिलं होतं. पण नंतर तो मुलीचा राग करायला लागला. मुलगी काळी असल्याने नातेवाईक नावं ठेवतात, असं त्याचं मत होतं. लोकेंद्रने अनेकदा मुलीला हॉस्टेल व आश्रमात ठेवण्यासाठी दबावही टाकला पण मी तयार नव्हते. या विषयावरून दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे, असं त्यांनी सांगितलं.
 

Web Title: Shocking The step taken by the father as the daughter was not beautiful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.