ताजमहाल मकबरा की शिवमंदिर, सरकारला विचारला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 09:26 PM2017-08-11T21:26:23+5:302017-08-12T11:49:53+5:30

The Shiv Mandir of Tajmahal Tomb, Government asked for question | ताजमहाल मकबरा की शिवमंदिर, सरकारला विचारला प्रश्न

ताजमहाल मकबरा की शिवमंदिर, सरकारला विचारला प्रश्न

Next

नवी दिल्ली, दि. 11 : जगातील सात आश्‍चर्यापैकी एक आश्‍चर्य असणारे ताजमहाल मकबरा आहे की प्राचीन शिवमंदिर? असा प्रश्न केंद्रीय माहिती आयोगानं (CIC)  सरकारकडे विचारला आहे. CICच्या या प्रश्नामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ताजमहाल संदर्भात माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या आधिरकारांतर्गत एक याचिका आयोगाकडे करण्यात आली होती. याच मुद्द्यावर CICनं सांस्कृतिक मंत्रालयाचं मत विचारलं आहे. त्याचप्रमाणे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणलाही याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. 
संगमरवरनं बनलेलं जगप्रसिद्ध ताजमहाल हे शहाजान यांनी बनवलेला मकबरा आहे की राजा मानसिंह या राजपूत राजानं बनवलेला आणि मुगल शासकाला भेट दिलेलं शिवालय आहे? असा प्रश्न CIC चे आयुक्त श्रीधर आचार्यालू यांनी विचारला आहे.  उल्लेखनीय म्हणजे, याअगोदर ताजमहलच्या इतिहासाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टासमवेत देशातील इतर अनेक न्यायलयांनी खटले रद्दबादल ठरवलेत.  

जगातील भव्य-दिव्य अशा दहा वास्तूंच्या यादीमध्ये ताजमहालनं स्थान पटकावलं आहे. प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू Travellers’ Choice awards for Landmarks च्या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या यादीत जागा मिळवणारी ही भारतातील एकमेव वास्तू आहे. आशियातील भव्य वास्तूंचा विचार केला तर ताजमहालचा क्र मांक दुसरा लागतो. पहिलं स्थान कंबोडियामधल्या अंग्कोर वॅटनेच परत पटकावलं आहे. खरंतर भारतात अशा अनेक वास्तू आहे ज्यांची रचना आणि सौंदर्य हे पाहणाऱ्याला आवाक करतं. पण तरीही यादीत भारतातला ताजमहालच का? असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. याचं उत्तर जितकं ताजमहालचं सौंदर्य आहे तितकं ते सौंदर्य जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून पुरवलं जाणारं लक्षही आहे.  

 

Web Title: The Shiv Mandir of Tajmahal Tomb, Government asked for question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.