अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात शशी थरुर यांचा माणहाणीचा दावा

By admin | Published: May 27, 2017 12:14 AM2017-05-27T00:14:13+5:302017-05-27T00:14:13+5:30

कॉंग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात मानहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Shashi Tharoor's claim to be an offense against Arvind Goswami | अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात शशी थरुर यांचा माणहाणीचा दावा

अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात शशी थरुर यांचा माणहाणीचा दावा

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - कॉंग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात मानहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात दोन कोटी रुपयांचा माणहाणीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती खुद्द शशी थरुर यांनीच ट्विटरच्या माध्यमातून शुक्रवारी दिली.  
अर्णव गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीने शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी खुलासा केला होता, की सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर शशी थरुर त्यांच्या खोलीत आले होते आणि त्यांनी त्यांचा मृतदेह बाजूला केला होता. रिपब्लिक टीव्हीवर एका विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अर्णव गोस्वामी यांनी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर शशी थरुर यांनी खोलीत येऊन पुराव्यांशी छेडछाड केल्याचा दावा केला असून याप्रकरणी पुरावे असल्याचे म्हटले होते. दरम्यान, याप्रकरणी शशी थरुर यांनी अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात दोन कोटी रुपयांचा माणहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. 
सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. यानंतर त्यांच्या मृत्यूचे  गूढ वाढतच चालले होते. तसेच, शशी थरुर यांच्यावर सुद्धा संशयाची सुरी जात असल्याचे पाहयला मिळाली होती. अद्याप त्यांचा मृत्यूचे कारण समजू शकले नाही. 
 

Web Title: Shashi Tharoor's claim to be an offense against Arvind Goswami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.