लज्जास्पद...हजारो कोटींच्या घोटाळेबाजाला पोलिसांनी पार्टीसाठी नेले क्लबमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 11:12 AM2019-06-05T11:12:52+5:302019-06-05T11:14:14+5:30

अनुभव हा सोशल नेटवर्किंग साईट एब्लेज इन्फो सोल्यूशन्सचा मालक आहे.

Shameful ...Thousands of crores scams accused have been taken by the police in club for party | लज्जास्पद...हजारो कोटींच्या घोटाळेबाजाला पोलिसांनी पार्टीसाठी नेले क्लबमध्ये

लज्जास्पद...हजारो कोटींच्या घोटाळेबाजाला पोलिसांनी पार्टीसाठी नेले क्लबमध्ये

Next

नोएडा : 3760 कोटी रुपयांच्या ऑनलाईन घोटाळ्यातील आरोपी अनुभव मित्तल आणि त्याची पत्नी आयुषी यांना उत्तर प्रदेशच्यापोलिसांनी मित्रांसोबत पार्टी  करण्यासाठी क्लबमध्ये नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. 


अनुभव हा सोशल नेटवर्किंग साईट एब्लेज इन्फो सोल्यूशन्सचा मालक आहे. या दोघांना 3 जूनला लखनऊच्या तुरुंगातून फरीदाबादच्या न्यायालयात हजर करण्यासाठी आणण्यात आले होते. त्याला पुन्हा लखनऊला घेऊन जाण्याऐवजी त्याच्या नोएडाच्या मित्रांकडे घेऊन गेले. 


याच वेळी मित्तल याच्याकडून फसवणूक झालेल्या एका व्यक्तीने त्यांना पाहिले आणि पार्टी करतानाचा व्हिडिओ व्हायरल केला. यामुळे सगळ्या प्रकाराचा भांडाफोड झाला. तक्रार मिळाल्यानंतर डीजीपी ओ पी सिंह यांनी पोलिसांना निलंबित केले आहे. मित्तल दांपत्यासोबत त्यांना लखनऊला पोहोचायचे होते, मात्र लक्झरी कारमधून ते नोएडाला पोहोचल्याचे त्यांनी मान्य केले आहे.



 

आरोपीने मित्रासोबत पार्टी केली, पत्नी ब्युटीपार्लरमध्ये गेली
पोलिस या दोघांना घेऊन नोएडाच्या सेक्टर 121 येथील क्लियो काऊंटी सोसायटीमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मित्राकडे गेले. अनुभवला त्याचा मित्र पोलिसांसोबत एका क्लबमध्ये घेऊन गेला, तर त्याची पत्नी ब्युटी पार्लरमध्ये महिला पोलिसांसोबत मेकअप करण्यासाठी गेली. 




हात जोडून मागितली माफी
अनुभवला पाहिल्यानंतर फसवणूक झालेल्या या व्यक्तीने इतरांना बोलावले. यानंतर दंगा झाल्याने अनुभवने लोकांची माफी मागायला सुरुवात केली. यानंतर पोलिस त्याला स्थानिक पोलिस ठाण्यात घेऊन गेली. त्यांच्यावर 7 लाख लोकांना 3760 कोटींना फसवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Shameful ...Thousands of crores scams accused have been taken by the police in club for party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.