वाजत-गाजत वरातीत घोड्यावर बसून नवरदेवाच्या वेशात उमेदवाराने दाखल केला अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 09:27 AM2019-04-09T09:27:51+5:302019-04-09T09:28:22+5:30

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील एका उमेदवारांने चक्क स्वत: नवरदेवाच्या वेशात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Shahjahanpur: Sanyukt Vikas Party's candidate Vaidh Raj Kishan rode a horse dressed as a bridegroom, to file his nomination yesterday for in LokSabhaElections2019 | वाजत-गाजत वरातीत घोड्यावर बसून नवरदेवाच्या वेशात उमेदवाराने दाखल केला अर्ज 

वाजत-गाजत वरातीत घोड्यावर बसून नवरदेवाच्या वेशात उमेदवाराने दाखल केला अर्ज 

googlenewsNext

शाहजहांपूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. यंदाच्या या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून अनेक कल्पना लढविण्यास सुरुवात होत आहे. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील एका उमेदवारांने चक्क स्वत: नवरदेवाच्या वेशात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्याने घोडावर बसून बँड बाजा वाजवत वरात सुद्धा काढली. 

वैद्यराज किशन असे या उमेदवाराचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीसाठी संयुक्त विकास पार्टीकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यराज किशन आले होते. यावेळी त्यांनी नवरदेवाच्या वेशभूषेत येत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच, त्यांनी घोडावर बसून बँड बाजा वाजवत वरात काढली. दरम्यान, वैद्यराज किशन यांनी याविषयी बोलताना पत्रकारांना सांगितले की, 'आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यामुळे मी नवरदेवाच्या वेशात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलो आहे.' 




दुसरीकडे, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे. येत्या 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.  

Web Title: Shahjahanpur: Sanyukt Vikas Party's candidate Vaidh Raj Kishan rode a horse dressed as a bridegroom, to file his nomination yesterday for in LokSabhaElections2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.