शहीद राजगुरु नागपूरच्या मोहिते वाड्याच्या शाखेचे स्वयंसेवक - RSS चा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2018 06:26 PM2018-04-01T18:26:58+5:302018-04-01T18:26:58+5:30

राजगुरु हे संघ संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचे निकटवर्तीय होते.

Shaheed Rajguru Claims RSS - volunteers of Mohite wadas branch of Nagpur | शहीद राजगुरु नागपूरच्या मोहिते वाड्याच्या शाखेचे स्वयंसेवक - RSS चा दावा

शहीद राजगुरु नागपूरच्या मोहिते वाड्याच्या शाखेचे स्वयंसेवक - RSS चा दावा

Next

मुंबई - भारतीय स्वतंत्र लढ्यात मोलाची कामगिरी करणारे महान क्रांतिकारक राजगुरु हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, असा खळबळजनक दावा संघाचे माजी प्रचारक आणि पत्रकार नरेंद्र सेहगल यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. इंग्रज आधिकारी सँडर्सच्या हत्येनंतर शहीद राजगुरु हे नागपुरातील संघ मुख्यालयात येऊन गेले होते, असंही त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.

‘भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता’ या पुस्तकाच्या आधारे सहगल यांनी संघ देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होता हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इंग्रजांविरोधात लढताना आपल्या प्राणाची आहुती देणारे शहीद राजगुरु हे नागपूर येथील मोहिते वाड्याच्या शाखेचे स्वयंसेवक असल्याचा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकाचे वाटप आता संघाच्या स्वयंसेवकांमध्ये केले जात आहे. 

Web Title: Shaheed Rajguru Claims RSS - volunteers of Mohite wadas branch of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.