सेट टॉप बॉक्स कंपनीही आता बदलता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 06:11 AM2019-01-28T06:11:52+5:302019-01-28T06:12:10+5:30

पोर्टेबिलिटीचे संकेत; वर्षभरात अंमलबजावणीची शक्यता

Set-top box company can also be changed now | सेट टॉप बॉक्स कंपनीही आता बदलता येणार

सेट टॉप बॉक्स कंपनीही आता बदलता येणार

Next

मुंबई : मोबाइल कंपनीप्रमाणे सेट टॉप बॉक्स कंपनीची सेवा बदलता येणे लवकरच शक्य होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) अध्यक्षांनी याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. हा निर्णय अंमलात आल्यास सध्या सेट टॉप बॉक्स कंपन्यांच्या सुरू असलेल्या बेलगाम कारभाराला चाप बसेल, असे बोलले जाते.

केबल किंवा डीटीएच कंपनीची सेवा घेतलेल्या ग्राहकांना सध्या सेट टॉप बॉक्समुळे कंपनी बदलण्यात अडथळे येतात. ग्राहकांची होणारी कुचंबणा या निर्णयामुळे दूर होईल. डीटीएच कंपन्या व केबल सेवा पुरवठादारांकडून या प्रस्तावाला तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करणे ट्रायला कठीण जाणार आहे.

प्रत्येक आॅपरेटरच्या सेट टॉप बॉक्सची तांत्रिक बांधणी वेगळी असल्याने त्यामध्ये दुसऱ्या कंपनीची सेवा देण्यामध्ये पायरसी व इतर तांत्रिक बाबींचा गोंधळ होण्याची शक्यता कंपन्यांकडून वर्तवण्यात येत आहे. प्रत्येक कंपनीच्या सेट टॉप बॉक्समधील सॉफ्टवेअर वेगवेगळे असल्याने एका कंपनीच्या सेट टॉप बॉक्सवरून दुसºया कंपनीची सेवा पुरवणे अवघड होणार आहे.

त्यामुळे सेट टॉप बॉक्समध्ये सॉफ्टवेअर लागू करण्याऐवजी कोणत्याही कंपनीची सेवा घेता येईल, अशा प्रकारचे सेट टॉप बॉक्स बसवण्याच्या पर्यायावर काम करण्याची गरज शर्मा यांनी वर्तवली. सरकारच्या तांत्रिक सुविधा पुरवणाºया विभागांची मदत घेण्यात येत असून, यामध्ये मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले. यासाठी लागणारा वेळ अपेक्षेपेक्षा जास्त लागत आहे. मात्र तरीही प्रक्रिया वर्षभरात पूर्ण करण्यात यश मिळेल, असा दावा शर्मा यांनी केला.

१६ कोटी ग्राहकांची कुचंबणा
देशात १६ कोटी ग्राहकांकडे सेट टॉप बॉक्स सेवा आहे. त्यांना सध्याच्या कंपनीची सेवा बदलण्याची व्यवस्था नाही. नवीन सेट टॉप बॉक्स विकसित केल्यावर जुन्या बॉक्सचे काय करायचे, असा प्रश्न आहे.

Web Title: Set-top box company can also be changed now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.