५ कोटी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 08:47 AM2019-06-12T08:47:39+5:302019-06-12T08:47:50+5:30

अल्पसंख्याक समाजातील ५ कोटी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी मंगळवारी केली.

Scholarship to 5 million minority students | ५ कोटी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप

५ कोटी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप

Next

नवी दिल्ली : येत्या पाच वर्षांत देशाच्या विविध अल्पसंख्याक समाजातील ५ कोटी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी मंगळवारी केली. शाळेतील, तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल, असे सांगून नकवी म्हणाले की, या योजनेचा फायदा ५0 टक्के मुलींनाही दिला जाणार आहे.

सर्वसमावेशक व सर्वस्पर्शी विकास व समाज घडवून आणण्यासाठी, तसेच सर्वांना न्याय मिळावा यासाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे. मौलाना आझाद एज्युकेशन फाऊं डेशनच्या ११२ व्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले की, देशातील सर्व मदरशांमध्ये हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, संगणक या विषयांतील शिक्षण दिले जाईल, असे सांगून नकवी म्हणाले की, मदरशांसाठी अभ्यासक्रम सुरू करण्याचे काम सुरू असून, पुढील महिन्यापासून त्याची अंमलबजावणी करणे शक्य होईल. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण अधिक आहे, हे लक्षात घेऊ न त्यांना अन्य प्रकारचे प्रशिक्षण देणे व रोजगार मिळवून देणे यावर आम्ही भर देणार आहोत.
>स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण
मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध, पारसी या सर्व समाजांना या शिष्यवृत्तीचा फायदा मिळवून दिला जाईल, असा दावाही मंत्र्यांनी केला. बँकिंग, राज्य व केंद्र सरकारी नोकºया, रेल्वे, तसेच अन्य सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी त्यांनी करावी, यासाठी या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

Web Title: Scholarship to 5 million minority students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.