लवकरच चलनात येणार एक रुपयाची नोट

By admin | Published: May 30, 2017 09:36 PM2017-05-30T21:36:35+5:302017-05-30T21:36:35+5:30

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लवकरच एक रुपयाची नोट चलनात आणली जाणार आहे. आरबीआयने आज यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

A rupee note that will soon come in currency | लवकरच चलनात येणार एक रुपयाची नोट

लवकरच चलनात येणार एक रुपयाची नोट

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लवकरच एक रुपयाची नोट चलनात आणली जाणार आहे. आरबीआयने आज यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. या पत्रकात म्हटल्याप्रमाणे भारत सरकारकडून एका रूपयाच्या नव्या नोटेची छपाई पूर्ण झाली आहे. नव्या नोटा चलनात आल्यानंतरही सध्या चलनात असलेल्या एक रूपयाच्या जुन्या नोटा वैधच राहणार आहेत. नव्या नोटेच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, केवळ रंग बदलण्यात आला आहे. नवीन नोट पुढच्या आणि पाठच्या दोन्ही बाजुंनी गुलाबी आणि हिरव्या रंगाची असेल. जवळपास दोन दशकांपर्यंत एक रुपयांच्या नोटेवर बंदी ठेवल्यानंतर 2015 साली या नोटा पुन्हा बाजारात आणण्यात आल्या.

केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर सरकारने लगेच दोन हजारांची नोट चलनात आणली. लगोलग पाचशे रुपयांची नवी नोटही आणण्यात आली.

Web Title: A rupee note that will soon come in currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.