विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या अब्जाधीश प्रियकराला प्रेयसीसाठी सुरू करायची होती 'रॉयल एअरलाइन्स'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 02:09 PM2017-11-01T14:09:05+5:302017-11-01T16:22:06+5:30

जेट एअरवेजच्या विमानात बॉम्ब ठेवल्याचे सांगून विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या बिरजू सल्ला याच्या चौकशीमधून अनेक खुलासे होत आहेत.

'Royal Airlines' was supposed to launch a billionaire lover threatening to kidnap the plane. |  विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या अब्जाधीश प्रियकराला प्रेयसीसाठी सुरू करायची होती 'रॉयल एअरलाइन्स'

 विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या अब्जाधीश प्रियकराला प्रेयसीसाठी सुरू करायची होती 'रॉयल एअरलाइन्स'

Next

नवी दिल्ली - जेट एअरवेजच्या विमानात बॉम्ब ठेवल्याचे सांगून विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या बिरजू सल्ला याच्या चौकशीमधून अनेक खुलासे होत आहेत. गुजरातमधील अब्जाधीश जवाहिर असणाऱ्या बिरजू याला विमान कंपनीत काम करत असलेल्या प्रेससीसाठी रॉयल एअरलाइन्स सुरू करायची होती. 
37 वर्षीय बिरजू सल्ला याची सध्या अहमदाबाद येथे क्राइम ब्रँचकडून चौकशी सुरू आहे. त्यावेळी बिरजू याने आपल्याला विमान कंपनीत काम करत असलेल्या प्रेससीसाठी विमान कंपनी सुरू करायची असल्याचे सांगितले. बिरजू याला याआधीही यावर्षीच्या जुलै महिन्यात विमान अपहरणविरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले होते की, या व्यक्तीला ‘नो फ्लाय’ श्रेणीत टाकण्यात यावे.  
 मुंबईहून दिल्लीला जाणारे जेट एअरवेजचे विमान रविवारी पहाटे अपहरण आणि बॉम्बच्या धमकीनंतर तातडीने अहमदाबाद येथे विमानतळावर उतरविण्यात आले होते. या विमानात ११५ प्रवासी व चालक दलाचे ७ कर्मचारी होते. विमानाच्या स्वच्छतागृहात उर्दू व इंग्रजीत लिहिलेली एक चिठ्ठी मिळाली. ‘विमानात १२ अपहरणकर्ते आहेत व विमानाच्या सामान ठेवण्याच्या जागेत बॉम्ब ठेवले आहेत. विमान कुठेही न थांबविता थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घेऊन जावे, अन्यथा बॉम्बचो स्फोट केले जातील,’ अशी धमकी त्या चिठ्ठीत होती.  
या विमानाने मुंबईहून रविवारी पहाटे २.५५ वाजता उड्डाण केले होते. विमानात चिठ्ठी सापडताच वैमानिकाने ताबडतोब जवळच असलेल्या अहमदाबाद विमानतळाच्या वाहतूक नियंत्रकांशी संकर्प साधला. हे विमान (९ डब्ल्यू ३३९) सोमवारी पहाटे ३.४५ वाजता अहमदाबाद विमानतळावर उतरविण्यात आले होते. 
तेथे सर्व प्रवाशांना खाली उतरवून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. याबाबत माहिती देताना सुरक्षा ब्यूरोच्या एका अधिका-याने सांगितले की, सर्व प्रवाशांची झडती घेतल्यानंतर काहीही सापडले नाही. या विमानतळावर ६ तासांपेक्षा अधिक वेळ तपासणी आणि अन्य कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सकाळी १०.३० वाजता हे विमान दिल्लीसाठी रवाना झाले.
उर्दू आणि इंग्रजी भाषेत लिहिलेल्या या चिठ्ठीत ‘अल्लाह इज ग्रेट’ असे लिहिले आहे. यात असा इशाराही दिला होता की, जर आपण विमानाच्या लँडिंगचा प्रयत्न कराल, तर तुम्हाला विमानात लोकांच्या मृत्यूचे चित्र दिसेल. याला थट्टा समजू नका. सामान ठेवण्याच्या जागी बॉम्ब आहेत. विमानाच्या लँडिंगचा प्रयत्न केला, तर स्फोट होईल.
त्यानंतर विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या बिरजू सल्ला याला अटक करण्यात आली होती. तो गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील राजुला येथील रहिवासी आहे. 

Web Title: 'Royal Airlines' was supposed to launch a billionaire lover threatening to kidnap the plane.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.