Reprisal for love jihad? Man killed, body set on fire | लव्ह जिहादचा बदला? हत्या करून तरूणाचा मृतदेह जाळला, रेकॉर्ड केलेला व्हिडीओ व्हायरल

ठळक मुद्देसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक 45 वर्षीय व्यक्त एका तरूणाची हत्या करून त्याचा मृतदेह जाळताना दिसतो आहे. हत्या केलेल्या तरूणाचा अर्धा जळलेला मृतदेह घटनास्थळावर सापडला आहे.

उदयपूर- राजस्थानमध्ये ह्रदयद्रावक घटना घडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती तरूणाची हत्या करून त्याचा मृतदेह जाळताना दिसतो आहे. राजसमंद येथील एका हॉटेलपासून जवळच निर्जन रस्त्यालगत बुधवारी अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. याच सुमारास राजसमंदमध्ये ‘लव्ह जिहाद’चा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला. बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी या व्हिडिओत जाळलेल्या तरुणाचाच मृतदेह सापडल्याचे स्पष्ट केल. हत्या करणारा व्यक्तीचं नाव शंभू लाल असून घटनेनंतर तो फरार होता.पण शंभू लाल याला आता अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून केला जाणार असल्याचं राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी म्हंटलं आहे. बुधवारी ही घटना घडली असून घटनास्थळावरून ताब्यात घेतलेला मृतदेह हा व्हिडीओमधील व्यक्तीचाच असल्याचं बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी सांगितलं.

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कुऱ्हाडीने हल्ला करून तरूणाची हत्या करताना दिसते आहे. तसंच हत्येनंतर तरूणाचा मृतदेह जाळताना व्हिडीओमध्ये दिसतं आहे. ‘आमच्या देशात लव्ह जिहाद थांबवा. अन्यथा तुमची अशीच अवस्था होईल’, अशी धमकीच त्याने दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक मोटारसायकल आणि स्कूटी दिसते आहे. व्हिडीओमध्ये ज्या प्रकारे दृश्य दिसत आहेत त्यानुसार व्हिडीओ रेकॉर्ड करणारा कुणीतरी तिसरा व्यक्ती घटनास्थळी होता. 

एसपी मनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आफ्राझूल अशी हत्या झालेल्या तरूणाची ओळख पटली आहे. पीडित व्यक्ती पश्चिम बंगालच्या मालदाची रहिवासी आहे. राजस्थानमध्ये पीडित तरूण मजुरी करत होता. गुरूवारी सकाळी आम्ही मृतदेह ताब्यात घेतला. पण व्हिडीओ समोर येइपर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती. दरम्यान, व्हिडीओतील आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याचा तपास सुरू आहे.