बलात्कारपीडित मुलीला पिता उपचारासाठी रोज कडेवर नेतो

By Admin | Published: August 30, 2015 12:33 AM2015-08-30T00:33:42+5:302015-08-30T00:33:42+5:30

झारखंडच्या एका छोट्या गावात मजुरी करणारी व्यक्ती दररोज ९ वर्षांच्या आपल्या बलात्कारपीडित मुलीला कडेवर घेऊन जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेतो.

A rape victim has been taken to the house everyday for treatment | बलात्कारपीडित मुलीला पिता उपचारासाठी रोज कडेवर नेतो

बलात्कारपीडित मुलीला पिता उपचारासाठी रोज कडेवर नेतो

googlenewsNext

घाटसिला : झारखंडच्या एका छोट्या गावात मजुरी करणारी व्यक्ती दररोज ९ वर्षांच्या आपल्या बलात्कारपीडित मुलीला कडेवर घेऊन जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेतो. त्याच्याकडे सायकल घेण्यासाठी पैसे नाहीत; मात्र पैसे नाहीत म्हणून तो मुलीच्या उपचारात अजिबात खंड पडू देत नाही. पाऊस, ऊन किंवा वारा कोणीही त्याचा मार्ग अडवू शकत नाही.
दोन महिन्यांपूर्वी स्थानिक ड्रायव्हरने चॉकलेटचे आमिष दाखवून त्याच्या मुलीवर बलात्कार केला आणि नंतर तिला नदीच्या किनारी फेकून दिले. बलात्कारामुळे तिच्या आतड्याला गंभीर इजा झाली. शरीर व आतड्यातून रक्तस्राव होत होता. ती ना चालू शकत होती ना उभी राहू शकत होती. मोठ्या मुश्लिकीने घरी पोहोचून तिने आई-वडिलांना घटना सांगितली.
तिला लगेच स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेथे तिची प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे तिला जमशेदपूर येथे हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनाही तिचा रक्तस्राव थांबविता न आल्यामुळे अखेरीस तिला रांची येथील एका रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्या आतड्याची भयंकर अवस्था लक्षात घेऊन कोलेक्टॉमी आॅपरेशन केले आणि तिचे क्षतिग्रस्त आतडे हटवून तेथे कोलोस्टॉमी बॅग लावली.
शस्त्रक्रिया यशस्वी होऊन रक्तस्राव बंद झाला व मुलीला रुग्णालयातून सुटी दिली. आता घरी राहूनच रोज तिच्या जखमेची ड्रेसिंग करायची आहे. मुलीचे वडील म्हणाले, माझ्याकडे सायकल किंवा मोटरसायकल नसली म्हणून काय झाले. ती माझी मुलगी आहे. मी तिला टाकून देऊ शकत नाही. तिने लवकरात लवकर बरे व्हावे, असे आम्हाला वाटते. यासाठी मला तिला रोज डॉक्टरकडे न्यावे लागेल. मुलीचे वडील प्रचंड गरीब आहेत; मात्र त्यांचे धैर्य दाद द्यावे असे आहे. हटियापाटा या गावचा पिता दररोज मुलीला कडेवर घेऊन चार कि.मी. चालत डॉक्टरकडे जातो. तेथे मुलीची ड्रेसिंग केली जाते.
माओवादग्रस्त या भागात वाहतुकीची सुविधा नसल्यातच जमा आहे. सायकल खरेदीसाठी पैशाची आवश्यकता आहे ते देखील या कुटुंबाकडे नाहीत. पाऊस असो, तळपते ऊन असो हा पिता डॉक्टरकडे जाण्याचा नित्यनेम मोडत नाही. (वृत्तसंस्था)

मुलीसाठी आणखी काहीही सोसण्याची तयारी...
मुलीच्या उपचारामुळे हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहे. मुलीला दररोज डॉक्टरकडे न्यावे लागते, त्यामुळे मजुरीवर जाण्यासाठी वेळ मिळत नाही.
या कुटुंबाने आपली गुरे विकून त्या पैशाने मुलीसाठी नवे कपडे आणि भेटवस्तू आणल्या. उद्देश एकच मुलीला खुश ठेवायचे. तिला बरे झाल्याचे पाहण्यासाठी हे कुटुंब स्वत:ला गहाणही ठेवू शकते.
मुलीच्या वडिलाने पत्रकाराला सांगितले की, मी कामावर जाऊ शकत नाही. सध्या माझी मुलगी माझ्यासाठी सर्वात प्राधान्याची बाब आहे.
आमच्याकडे होते नव्हते ते सगळे संपले आहे. आता आमच्या डोक्यावर कर्जाचे ओझे आहे; मात्र मुलीसाठी आणखी कितीही सोसण्याची आमची तयारी आहे.

Web Title: A rape victim has been taken to the house everyday for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.