पत्नीशी बळजबरी 'ओरल सेक्स' बलात्कार आहे का? हायकोर्ट देणार फैसला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 07:40 PM2017-11-07T19:40:04+5:302017-11-07T19:41:01+5:30

ओरल सेक्ससाठी पती बळजबरी करत असल्याची तक्रार पत्नीने पतीविरोधात केली होती. तर, महिलेच्या पतीने आपल्यावरील आरोप हटवण्यात यावे यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

Is Rape 'Oral Sex' Rape With A Wife? High Court Decision Decision | पत्नीशी बळजबरी 'ओरल सेक्स' बलात्कार आहे का? हायकोर्ट देणार फैसला

पत्नीशी बळजबरी 'ओरल सेक्स' बलात्कार आहे का? हायकोर्ट देणार फैसला

Next

अहमदाबाद : पत्नीवर ओरल सेक्ससाठी दबाव टाकणं हे बलात्कार आणि क्रूरतेच्या श्रेणीमध्ये येतं का? गुजरात उच्च न्यायालय या प्रकरणी निर्णय देणार आहे. तसंच अशा प्रकरणांमध्ये पतीला आरोपी बनवून खटला चालवला जाऊ शकतो का? याबाबतही न्यायालय निर्णय देणार आहे.

ओरल सेक्ससाठी पती बळजबरी करत असल्याची तक्रार पत्नीने पतीविरोधात केली होती. तर, महिलेच्या पतीने आपल्यावरील आरोप हटवण्यात यावे यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. न्यायमूर्ती जे बी परडीवाला यांनी सोमवारी राज्य सरकारला या प्रकरणी उत्तर देण्यास सांगितलं असून कोर्टाने महिलेलाही नोटीस पाठवली आहे. 

वैवाहिक बलात्काराच्या घटना भारतात घडतात. हा एक घृणास्पद गुन्हा असून यामुळे लग्नासारख्या नात्याच्या विश्वासाला तडा पोहोचला आहे.  देशात या घडत असून त्या निंदनीय आहेत, असं न्यायालयाने म्हटलं. 

ओरल सेक्ससाठी बळजबरी केली जात असेल तर कलम 377 किंवा क्रूरतेसाठी कलम 498अ अंतर्गत गुन्हा मानला जाऊ शकतो का? किंवा कलम 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा ठरू शकतो का? अशा मुद्दयांवर हायकोर्टाने सरकारकडे उत्तरे मागितली आहेत.

Web Title: Is Rape 'Oral Sex' Rape With A Wife? High Court Decision Decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.