राम रहीम, हनीप्रीतकडे संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक शौचालय दिनासाठी मागितला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 01:55 PM2017-10-04T13:55:42+5:302017-10-04T14:03:50+5:30

बलात्कार प्रकरणी तुरूंगात २० वर्षांचा तुरुंगवास भोगत असलेल्या राम रहीमकडे संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक शौचालय दिनाला पाठिंबा देण्यासाठी आवाहन केलं आहे.

Ram Rahim, Honeypreet, the United Nations has asked for a world toilets day | राम रहीम, हनीप्रीतकडे संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक शौचालय दिनासाठी मागितला पाठिंबा

राम रहीम, हनीप्रीतकडे संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक शौचालय दिनासाठी मागितला पाठिंबा

Next
ठळक मुद्दे बलात्कार प्रकरणी तुरूंगात २० वर्षांचा तुरुंगवास भोगत असलेल्या राम रहीमकडे संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक शौचालय दिनाला पाठिंबा देण्यासाठी आवाहन केलं आहे. राम रहीमसोबतच त्याची दत्तक मुलगी हनीप्रीत इन्साकडेही संयुक्त राष्ट्र संघाने शौचालय दिनाला समर्थन देण्यासाठी आवाहन केलं आहे.

नवी दिल्ली- बलात्कार प्रकरणी तुरूंगात २० वर्षांचा तुरुंगवास भोगत असलेल्या राम रहीमकडे संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक शौचालय दिनाला पाठिंबा देण्यासाठी आवाहन केलं आहे. राम रहीमसोबतच त्याची दत्तक मुलगी हनीप्रीत इन्साकडेही संयुक्त राष्ट्र संघाने शौचालय दिनाला समर्थन देण्यासाठी आवाहन केलं आहे. संयुक्त राष्ट्र संघाने ट्विटरच्या माध्यमातून हे आवाहन केलं आहे. संयुक्त राष्ट्र संघाचं हे ट्विट सगळीकडे चर्चेचा विषय आहे. बलात्कार प्रकरणी तुरूंगात असलेल्या राम रहीमचा पाठिंबा संयुक्त राष्ट्रसंघाने मागितल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. @UN_Water ट्विटर हँडलकडून हे ट्विट करण्यात आलं आहे.

संयुक्त राष्ट्र संघाकडून १९ नोव्हेंबर रोजी ‘जागतिक शौचालय दिन’ साजरा केला जाणार आहे. @UN_Water ट्विटर हँडलकडून एक ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून ‘जागतिक शौचालय दिना’चं समर्थन करण्याचं आवाहन संयुक्त राष्ट्राकडून राम रहीम आणि हनीप्रीतला करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये राम रहिम आणि हनीप्रीतला टॅग करण्यात आलं आहे. ‘प्रिय हनीप्रीत इन्सा आणि राम रहीम, तुम्ही जागतिक शौचालय दिनाला पाठिंबा द्याल, अशी आम्हाला आशा आहे,’ असं संयुक्त राष्ट्र संघाने ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

 

संयुक्त राष्ट्र संघाकडून करण्यात आलेल्या या ट्विटबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. साध्वींवरील बलात्कार प्रकरणात कोर्टाने दोषी ठरविलेला राम रहीम सध्या रोहतकमधील तुरुंगात शिक्षा भोगतो आहे. राम रहीमला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने महिन्याभरापूर्वी २० वर्षांची शिक्षा सुनावली. राम रहीमला न्यायालयाने २५ ऑगस्टला दोषी ठरवलं. यावेळी हनीप्रीत त्याच्यासोबत होती. राम रहीमला दोषी ठरवताच हरयाणातील अनेक भागांमध्ये हिंसाचार उसळला होता. यानंतर हनीप्रीत फरार झाली होती. सात राज्यांचे पोलीस तिचा शोध घेत होते. अखेर मंगळवारी हनीप्रीतला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर हनीप्रीतची चौकशी केली जाते आहे. हनीप्रीतने या चौकशी दरम्यान गेल्या 38 दिवसांपासून कुठे लपली होती? याचाही खुलासा केला आहे.

दरम्यान, @UN_Water या ट्विटर हँडलवरून हे दोन्ही ट्विट डिलीट करण्यात आले आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघानेच हे ट्विट केले की अकाऊंट हॅक झालं? याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Ram Rahim, Honeypreet, the United Nations has asked for a world toilets day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.