राम आमचे आराध्यदैवत, तर भाजपासाठी केवळ मतदैवत, सपा नेत्याची घणाघाती टीका  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 05:58 PM2018-06-04T17:58:38+5:302018-06-04T18:24:52+5:30

भगवान श्रीराम हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. मात्र भाजपासाठी श्रीराम हे केवळ मतदैवत आहेत, अशी घणाघाती टीका समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते...

Ram is our God - Ramgovind Chaudhary | राम आमचे आराध्यदैवत, तर भाजपासाठी केवळ मतदैवत, सपा नेत्याची घणाघाती टीका  

राम आमचे आराध्यदैवत, तर भाजपासाठी केवळ मतदैवत, सपा नेत्याची घणाघाती टीका  

Next

लखनौ - भगवान श्रीराम हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. मात्र भाजपासाठी श्रीराम हे केवळ मतदैवत आहेत, अशी घणाघाती टीका समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्ष नेते रामगोविंद चौधरी यांनी केली आहे. यावेळी चौधरी यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. अमित शहा कुणी मास्टरमाइंड नाही तर प्रसारमाध्यमांनी त्यांना मास्टर माइंड बनवले आहे. अमित शहांना जे हवे असते तशाच बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये छापल्या आणि दाखवल्या जातात, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. 
उत्तर प्रदेशमधील बलिया येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चौधरी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही हल्ला केला. मुख्यमंत्र्यांनी हिंदूंचा धार्मिक रंग असलेल्या भगव्या रंगाला आपल्या आचरणाने बदनाम केले आहे. आपल्या असत्य आचरणातून लोकांना फसवून आणि खोटे बोलून भगव्याला बदनाम करण्याचे काम ते करत आहेत, असे चौधरी म्हणाले.  
 केवळ भाजपा आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करून न थांबता रामगोविंद चौधरी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले. ते पुढे म्हणाले, "भाजपा आणि आरएसएसच्या प्रचाराची पद्धत ही हिटलरसारखी आहे. कैराना आणि नूरपूरच्या निवडणुकीमध्ये दंगा करण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. मात्र तेथील मतदारांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला." तसेच राम मंदिर खटल्याचा निकाल आमच्या बाजूने लागेल, सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलेल्या दाव्याचा आधार घेत भाजपा आता न्यायालयाच्या निकालांनाही प्रभावित करत असल्याचा आरोप त्यांनी केला.  

Web Title: Ram is our God - Ramgovind Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.