अंदमान-निकोबार बेटांवर लवकरच रेल्वेचे जाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 05:35 AM2019-02-03T05:35:31+5:302019-02-03T05:35:56+5:30

अंदमान-निकोबार बेटावर लवकरच रेल्वेमार्गाचे काम सुरू करणार आहे. किनारपट्टीला लागून असलेल्या २४० किमी लांब रेल्वेमार्गावर पूल आणि रेल्वेस्थानक उभारले जाईल.

Rail network in Andaman and Nicobar islands soon | अंदमान-निकोबार बेटांवर लवकरच रेल्वेचे जाळे

अंदमान-निकोबार बेटांवर लवकरच रेल्वेचे जाळे

नवी दिल्ली : अंदमान-निकोबार बेटावर लवकरच रेल्वेमार्गाचे काम सुरू करणार आहे. किनारपट्टीला लागून असलेल्या २४० किमी लांब रेल्वेमार्गावर पूल आणि रेल्वेस्थानक उभारले जाईल.

हा रेल्वेमार्ग पोर्टब्लेअरला दिगलीपूरशी जोडणार असून दोन बेटांना जोडणारा हा पहिला रेल्वेमार्ग असेल. त्यामुळे ही दोन्ही बेट रेल्वेच्या नकाशावर येतील. सध्या ही दोन शहरे बससेवेने जोडली असून त्यासाठी सडकमार्गे ३५० किमी अंतर पार करावे लागते. बसने १४ तास तर जहाजाने २४ तास लागतात. किनारपट्टीलगत उभारला जाणाऱ्या रेल्वेमार्गासाठी २४१३.६८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या रेल्वेमार्गामुळे बेटांवरील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

ईशान्येकडील राज्यांच्या सीमांची सुरक्षा पाहता संरक्षण मंत्रालयाच्या रणनीतीच्यादृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरू शकतो, असे रेल्वेच्या नियोजन विभागाला वाटते. प्रसिद्ध काश्मीर लिंकप्रमाणेच हा राष्टÑीय प्रकल्प मानला जात असून त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्याची आवश्यकता राहील.

Web Title: Rail network in Andaman and Nicobar islands soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.