पाटी कोरी झाल्याने काँग्रेस उभारी घेईल - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 02:03 AM2018-03-09T02:03:00+5:302018-03-09T02:03:00+5:30

आता पाटी कोरी झाल्याने काँग्रेस पक्षास नवी संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा घेऊन काँग्रेस पक्ष नव्याने उभारी घेईल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे व्यक्त केला.

 Rahul Gandhi will stir up Congress due to party rule | पाटी कोरी झाल्याने काँग्रेस उभारी घेईल - राहुल गांधी

पाटी कोरी झाल्याने काँग्रेस उभारी घेईल - राहुल गांधी

Next

सिंगापूर - आता पाटी कोरी झाल्याने काँग्रेस पक्षास नवी संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा घेऊन काँग्रेस पक्ष नव्याने उभारी घेईल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे व्यक्त केला.
सिंगापूरमधील कंपन्यांच्या भारतीय वंशाच्या प्रमुखांसमोर बोलताना त्यांनी स्पष्ट उल्लेख केला नाही परंतु ‘कोºया पाटी’चा संदर्भ २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले जाण्याशी असावा. विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने ‘२-जी’सह अन्य घोटाळ्यांवरून रान उठविले होते.
राहुल गांधी म्हणाले की, सन २०१२मध्ये काँग्रेसने वादळ सोसले. सन २०१२ ते २०१४ या काळात सर्व व्यवस्था डळमळीत केल्या गेल्या आणि त्याचे परिणाम आपण पाहिले. आता आमची पाटी कोरी झाली आहे व नव्याने संधी मिळाली आहे.
देशात शांतता व सलोखा राहावा यात भाजपाला काही स्वारस्य नाही, असा आरोप करून राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस म्हणून आम्ही समाजाकडे जे संतुलन असायला हवे अशी व्यवस्था म्हणून पाहतो. याउलट भाजपाला शांतता व सामाजिक सलोख्याची फिकीर नाही. आमच्यापुढे आव्हाने आहेत. तरीही हे सामाजिक अभिसरण शांततेने, सर्वांना सोबत घेऊन व्हावे, असा प्रयत्न आहे.

नेताजींना श्रद्धांजली

राहुल गांधी यांनी सिंगापूरमधील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकावर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याखेरीज त्यांनी येथील सिंगापूर इंडियन असोसिएशनला भेट देऊन तेथील लोकांशी संवाद साधला.

Web Title:  Rahul Gandhi will stir up Congress due to party rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.