राफेलवरून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न; पी. चिदम्बरम यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 01:06 AM2018-10-13T01:06:16+5:302018-10-13T01:11:13+5:30

राफेल विमान खरेदी व्यवहार, शेअर बाजार गडगडणे, रुपयाची सुरू असलेली घसरण हे विषय अडचणीचे ठरल्याने मोदी सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी केला आहे.

Rafael tries to suppress the voice of opponents; P. Chidambaram's allegation | राफेलवरून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न; पी. चिदम्बरम यांचा आरोप

राफेलवरून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न; पी. चिदम्बरम यांचा आरोप

Next

नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी व्यवहार, शेअर बाजार गडगडणे, रुपयाची सुरू असलेली घसरण हे विषय अडचणीचे ठरल्याने मोदी सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी केला आहे.
राफेल खरेदी व्यवहारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स लिमिटेड या कंपनीवर मेहेरनजर केली असल्याचा आरोप काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात आहे. हे आरोप सरकार व रिलायन्स डिफेन्स लि. कंपनीने फेटाळून लावले आहेत.
ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी एका टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, राफेल प्रकरणातील गैरव्यवहार उजेडात आल्याने सरकार अस्वस्थ आहे. रुपयाची घसरण सुरू असून, शेअर बाजार कोसळत आहेत. व्याजदर वाढले आहेत.
या गोष्टींबद्दल बोलणाऱ्या विरोधकांचा आवाज पद्धतशीररीत्या दडपला जात आहे. ग्रीनपीसची बँकखाती अंमलबजावणी संचालनालयाने गोठविली. मीडिया क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक राघव बहल यांच्या घर व कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. भाजपचे खासदार अंदाज समित्यांचे अहवाल संसदेत मांडण्यामध्ये अनेक
अडथळे आणतात. अशा अनेक गोष्टी सध्या घडत आहेत. राफेल विमाने खरेदी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा करावा, अशी
मागणी काँग्रेसकडून सातत्याने होत आहे.

कार्तीवरील कारवाईचा टष्ट्वीटमध्ये उल्लेख नाही
पी. चिदम्बरम यांचा मुलगा कार्ती चिदम्बरम यांच्या ५४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालयाने टाच आणली आहे. तसेच कार्तीच्या इंग्लंड, स्पेन, तामिळनाडूतील उटीच्या बंगल्यांनाही टाळे ठोकण्यात आले आहे.
कार्तीच्या आयएनएक्स मीडिया हाऊसला बेकायदेशीरपणे पैसा मिळत असल्याचा आरोप झाला होता. अशा प्रकरणांपायीच ही कारवाई झाली. मात्र, त्याचा उल्लेख करण्याचे पी. चिदम्बरम यांनी आपल्या टष्ट्वीटमध्ये टाळले आहे.
तसेच कार्तीच्या मालकीचा बार्सिलोना येथील टेनिस क्लब, इंग्लंडमधील एक कॉटेज हाऊस, चेन्नईच्या बँकेतील ९० लाख रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट व अन्य काही मालमत्ताही अंमलबजावणी संचालनालयाने ताब्यात घेतली आहे.

Web Title: Rafael tries to suppress the voice of opponents; P. Chidambaram's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.