pyaate hudugir halli life season 4 reality show in controversy during audition girls alleged show organizers asked contestants to kiss and remove clothes | कपडे काढा आणि समोरच्याला किस करा, रिअॅलिटी शोच्या ऑडिशनमधला धक्कादायक प्रकार
कपडे काढा आणि समोरच्याला किस करा, रिअॅलिटी शोच्या ऑडिशनमधला धक्कादायक प्रकार

बंगळुरू : एका रिअॅलिटी शोच्या ऑडिशनदरम्यान कंटेस्टंट्ससोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. बंगळुरूमध्य़े ही घटना घडली आहे. स्टार स्वर्णा चॅनलवर लवकरच सुरू होणारा रिअॅलटी शो ‘प्याते हुदुगिर हाली लाइफ’ सीझन 4 साठी ऑडिशन महारानी लक्ष्मी अमानी कॉलेजमध्ये ठेवण्यात आले होते. या कॉलेजच्या अनेक तरुणींनी या ऑडिशनला हजेरी लावली होती. परंतू त्यांच्यासोबत येथे गैरव्यवहार झाल्याचा आरोप अनेक तरूणींनी केला आहे. 
या ऑडिशनदरम्यान तरूणींना उत्तरं द्यायला संकोच वाटेल अशा अनेक अश्लिल प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली, सेक्ससंदर्भात विविध प्रश्न विचारण्यात आले. तसंच ज्या तरूणी छोटे कपडे घालून आल्या होत्या त्यांना वेगळ्या रांगेत उभं करण्यात आलं. तुझे किती लवर्स आहेत? तुला सेक्सबद्दल माहीत आहे का? तू कधी सेक्स केलयंस का? तुझ्यासमोर उभ्या असलेल्या तरूणाला किस कर असंही सांगण्यात आलं, अशाप्रकारचे एकाहून एक गंभीर आरोप तरूणींनी केले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलं आहे. 
या प्रकाराचा तरूणींनी विरोध करण्यास सुरूवात केली, अनेक तरुणींचे पालक त्या ठिकाणी पोहोचले. वाढता विरोध पाहून अखेर घटनास्थळी पोलीस आले आणि ऑडिशन थांबवण्यात आलं.  दुसरीकडे,  तरूणींनी केलेले आरोप निराधार आहेत, आम्ही असे प्रश्न विचारत नाहीत. ज्यांचं सिलेक्शन झालं नाही ते असा आरोप करत आहेत. ऑडिशनदरम्यान काही तरूणी आम्ही काहीही करण्यास तयार आहोत असं म्हणतात, त्यांची परीक्षा घेण्यासाठी असे प्रश्न विचारले जातात असं स्पष्टीकरण ऑडीशनच्या आयोजकांकडून देण्यात आलं आहे.
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.