पबजीमधला गेमिंग पार्टनर आवडला; महिलेनं पतीकडे घटस्फोट मागितला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 01:31 PM2019-05-17T13:31:44+5:302019-05-17T13:32:52+5:30

पबजीमुळे एक संसार मोडण्याच्या मार्गावर

Pubg Addict Mother Calls Helpline For Divorce To Unite With Gaming Partner | पबजीमधला गेमिंग पार्टनर आवडला; महिलेनं पतीकडे घटस्फोट मागितला

पबजीमधला गेमिंग पार्टनर आवडला; महिलेनं पतीकडे घटस्फोट मागितला

googlenewsNext

अहमदाबाद: पबजीमुळे नात्यात दुरावा निर्माण होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यानंतर आता पबजीमुळे एका महिलेनं पतीकडून घटस्फोट मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गेमिंग पार्टनर आवडल्यानं एका मुलाची आई असलेल्या महिलेनं घटस्फोटाची मागणी केली आहे. यासाठी तिनं महिला हेल्पलाईनशी संपर्क साधून मदतदेखील मागितली. सध्या ही महिला पतीचं घरी सोडून माहेरी राहते. 

गुजरातच्या अहमदाबादमध्ये पबजीमुळे एक संसार मोडण्याच्या मार्गावर आहे. पबजीमधला पार्टनर आवडल्यानं घटस्फोट घ्यायचा आहे. त्यासाठी मदत करा, असा फोन महिला हेल्पलाइनमध्ये (181) काम करत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला आला. फोन करणारी महिला एका प्रतिष्ठीत कुटुंबातील असल्याची माहिती अधिकारी महिलेनं दिली. कौटुंबिक वादामुळे नव्हे, तर पबजीमधील पार्टनरसोबत राहण्याची इच्छा असल्यानं घटस्फोट हवा असल्याचं महिलेनं हेल्पलाईनला सांगितलं. 

'फोन करणाऱ्या महिलेचं वय 19 वर्षे आहे. गेल्याच वर्षी तिचा विवाह एका बांधकाम कंत्राटदारासोबत झाला. तिला एक मूलदेखील आहे. काही महिन्यांपूर्वी तिला पबजीचं व्यसन जडलं. ती सतत पबजी खेळू लागली. यादरम्यान तिची एका तरुणाशी ओळख झाली. तो तरुण नियमितपणे पबजी खेळायचा,' असं हेल्पलाईन कक्षात काम करणाऱ्या अधिकाऱ्यानं सांगितलं. 'पतीशी कोणताही वाद होत नाही, असं त्या महिलेनं सांगितलं. तिला केवळ पबजीमुळे संपर्कात आलेल्या त्या तरुणासोबत राहायचं आहे. त्यासाठी ती पतीचं घर सोडून माहेरी आली आहे. या महिलेचं कुटुंब तिच्या निर्णयाविरोधात आहे,' अशी माहिती हेल्पलाईनमध्ये समुपदेशक असलेल्या सोनल सागठिया यांनी दिली. 
 

Web Title: Pubg Addict Mother Calls Helpline For Divorce To Unite With Gaming Partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.