पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांना पत्नीशोक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 03:47 PM2019-05-01T15:47:20+5:302019-05-01T15:48:00+5:30

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या पत्नी भगवती बेन यांचे आज निधन झाले.

Prime Minister Narendra Modi's brother, Pralhad Modi's wife dies | पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांना पत्नीशोक

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांना पत्नीशोक

googlenewsNext

अहमदाबाद -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या पत्नी भगवती बेन यांचे आज निधन झाले. त्या 55 वर्षांचा होत्या. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या भगवती बेन या रुग्णालयात उपचार घेत होत्या. दरम्यान, आज हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. 

भगवती बेन ह्या गेल्या काही दिवसांपासून रक्तदाब, मुत्रपिंड आणि मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांना अर्धांगवायूचा झटकाही येऊन गेला होता. मृत्यूच्या वेळी त्यांच्यावर अहमदाबाद येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी हे अहमदाबाद येथे एक किराणा दुकान चालवतात. बऱ्याच वर्षांपासून त्यांचा नरेंद्र मोदींशी संपर्क आलेला नव्हता. गेल्या 13 वर्षांत मोदींसोबत फारशा भेटीगाठी झाल्या नसल्याचे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. 

प्रल्हाद मोदी हे आपल्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. तसेच ते गुजरातमधील रास्त दर धान्य दुकान आणि केरोसिन परवानाधारक असोसिएशनचे प्रमुख आहेत. हल्लीच त्यांनी गुजरात सरकारविरुद्ध आंदोलनही केले होते. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फार पूर्वी कुटुंब सोडले होते. त्यानंतर त्यांचा कुटुंबातील सदस्यांशी फारच कमी संपर्क आलेला आहे. मात्र गुजरात दौऱ्यावर आल्यानंतर ते वेळोवेळी आपल्या आईची भेट घेण्यासाठी जातात.  

Web Title: Prime Minister Narendra Modi's brother, Pralhad Modi's wife dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.