पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरविणार देशाचे मुख्य गुप्तहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 04:47 AM2019-06-26T04:47:46+5:302019-06-26T04:50:27+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार मंत्रिमंडळ सचिव आणि गुप्तचर विभागाचे (आयबी) संचालक या महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करणार

Prime Minister Narendra Modi will decide the country's main detective | पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरविणार देशाचे मुख्य गुप्तहेर

पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरविणार देशाचे मुख्य गुप्तहेर

Next

- हरीश गुप्ता
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार मंत्रिमंडळ सचिव आणि गुप्तचर विभागाचे (आयबी) संचालक या महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करणार असून यावर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार होत्या म्हणून गेल्या वर्षी या दोन्ही पदांना मुदतवाढ दिली गेली होती. ही दोन्ही पदे ही ठराविक मुदतीची असल्यामुळे पी. के. सिन्हा (मंत्रिमंडळ सचिव) आणि राजीव जैन (आयबीचे संचालक) यांना संकेतांना धरून मुदतवाढ दिली गेली होती. आश्चर्यकारक घडामोडीत पी. के. सिन्हा यांना केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांना बढती दिली जाणार हे स्पष्ट झाले त्याच्या आधीच तीन महिन्यांची मुदतवाढ दिली गेली.


भारतीय प्रशासन सेवेतील १९८२ च्या तुकडीचे झारखंड केडरचे अधिकारी राजीव गौबा हे ३० आॅगस्ट रोजी निवृत्त होत असून सिन्हा यांची वाढीव मुदत १२ सप्टेंबर रोजी संपत आहे. गौबा यांनी कार्यक्षमतेमुळे अतिशय उच्च दर्जाचे अधिकारी असा मान मिळवला असल्यामुळे त्यांना बढती दिली जाणारच नाही याची नोकरशाहीत कोणालाही खात्री नाही. सरकारमधील अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, सध्या दूरसंचार सचिव आणि दूरसंचार आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या बुद्धिमान अधिकारी अरुणा सुंदरराजन यांच्यासाठी अनेक संधींचा सागरच खुला झालेला असू शकतो. सुंदरराजन या १९८२ च्या तुकडीच्या केरळ केडरच्या आयएएस अधिकारी असून त्या खूप वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. देशाच्या प्रमुख गुप्तचर संस्थेमध्येही (आयबी) अशीच अनिश्चितता निर्माण झाली आहे.

आयबीच्या संचालक पदासाठी अस्थाना?

भारतीय पोलीस सेवेतील महासंचालक रँकचे राकेश अस्थाना यांच्या नावावर आयबीच्या संचालकपदासाठी चर्चा झालेली आहे. अस्थाना यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे मानले जाते. केंद्रीय गृहमंत्री बदलल्यामुळे आयबीचे संचालक थेट अमित शहा यांना अहवाल देतात. या पार्श्वभूमीवर शहा हे आपल्या आवडत्या अधिकाºयासाठी आग्रह करीत आहे, असे सूत्रांनी म्हटले.

Web Title: Prime Minister Narendra Modi will decide the country's main detective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.