पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत काळ्या कपड्यांना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 11:45 AM2019-01-02T11:45:40+5:302019-01-02T12:00:34+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी (5 जानेवारी) झारखंडमधील पलामू जिल्ह्यात सभा होणार आहे. मात्र या सभेत काळे झेंडे दाखवले जाऊ नयेत, यासाठी सभास्थानी कोणत्याही प्रकारचे काळे कपडे आणि काळ्या रंगाच्या वस्तू घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.  

prime minister narendra modi vist to plamu every black thing banned | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत काळ्या कपड्यांना बंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत काळ्या कपड्यांना बंदी

Next
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी (5 जानेवारी) झारखंडमधील पलामू जिल्ह्यात सभा होणार आहे. सभेत काळे झेंडे दाखवले जाऊ नयेत, यासाठी सभास्थानी कोणत्याही प्रकारचे काळे कपडे आणि काळ्या रंगाच्या वस्तू घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.  मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होणार असतील त्यांना ओळखपत्र देखील बंधनकारक करण्यात आले आहे.

मेदिनीनगर  - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी (5 जानेवारी) झारखंडमधील पलामू जिल्ह्यात सभा होणार आहे. मात्र या सभेत काळे झेंडे दाखवले जाऊ नयेत, यासाठी सभास्थानी कोणत्याही प्रकारचे काळे कपडे आणि काळ्या रंगाच्या वस्तू घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.  झारखंड पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होणार असतील त्यांना ओळखपत्र देखील बंधनकारक करण्यात आले आहे. झारखंडमध्ये शिक्षकांचा संप सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोणत्याही प्रकारची काळी वस्तू किंवा काळा कपडा परिधान करून सभामंडपात कुणी आला तर त्याला आता येऊ दिले जाणार नाही पोलीस अधीक्षक इंद्रजीत महाता यांनी दिली आहे. हा नियम सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही लागू आहे. शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्याकडून मोदी यांना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे आदेश जारी करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नरेंद्र मोदींच्या सभेत सहभागी होणाऱ्यांना काळे कपडे, स्वेटर, सॉक्स, ब्लेझर्स, बॅगा नेण्यावर आणि काळ्या रंगाचे शूज घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 

Web Title: prime minister narendra modi vist to plamu every black thing banned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.