पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंग यांचे हस्तांदोलन; शहिदांना वाहिली श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 06:14 AM2017-12-14T06:14:14+5:302017-12-14T06:14:29+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत परस्परांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची बुधवारी संसद भवनाबाहेर भेट झाली. या दोन्ही नेत्यांनी परस्परांना नमस्कार करून हस्तांदोलनही केले.

Prime Minister Narendra Modi and Manmohan Singh's clash; Wahily tribute to martyrs | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंग यांचे हस्तांदोलन; शहिदांना वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंग यांचे हस्तांदोलन; शहिदांना वाहिली श्रद्धांजली

Next

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत परस्परांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची बुधवारी संसद भवनाबाहेर भेट झाली. या दोन्ही नेत्यांनी परस्परांना नमस्कार करून हस्तांदोलनही केले.
संसद भवनाबाहेर परस्परांची भेट घेतल्यानंतर नरेंद्र मोदी व डॉ. मनमोहन सिंग २00१ साली संसदेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजलीही वाहिली. त्या हल्ल्याला आज १६ वर्षे पूर्ण झाली. त्या हल्ल्यात १0 जण मरण पावले होते. गुजरात निवडणुकीच्या प्रचारात भाजपावर जोरदार हल्लाबोल करणारे तिथे उपस्थित होते. परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज आणि कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी त्यांनी चर्चा केली. नरेंद्र मोदी व डॉ. मनमोहन सिंग यांची भेट झाली, तेव्हा तिथे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, विजय गोयल, जितेंद्र सिंह हेही उपस्थित होते.

Web Title: Prime Minister Narendra Modi and Manmohan Singh's clash; Wahily tribute to martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.