दूषित रक्तामुळे गर्भवती महिलेस एड्सची बाधा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 05:39 AM2018-12-27T05:39:45+5:302018-12-27T05:39:59+5:30

एड्सग्रस्ताचे दूषित रक्त एका गर्भवती महिलेला दिल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूतील सत्तूर शहरात घडली आहे.

 Prevention of AIDS in pregnant woman due to contaminated blood | दूषित रक्तामुळे गर्भवती महिलेस एड्सची बाधा

दूषित रक्तामुळे गर्भवती महिलेस एड्सची बाधा

Next

सत्तुर : एड्सग्रस्ताचे दूषित रक्त एका गर्भवती महिलेला दिल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूतील सत्तूर शहरात घडली आहे. तिला दिलेले रक्त शिवाकाशी येथे संकलित केले होते. याप्रकरणी संबंधित रक्तपेढीच्या एका कर्मचाऱ्याला नोकरीतून काढून टाकण्यात आले असून, अन्य दोघांना निलंबित केले आहे.
२३ वर्षे वयाची ही महिला बाळंतपणासाठी सत्तुर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. हिमोग्लोबीन कमी असल्याने तिला रक्त देण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानुसार रक्तपेढीतून रक्त मागविण्यात आले. ते रक्त एड्सग्रस्ताचे असल्याचे नंतर केलेल्या तपासणीत उघड
झाले.
या घटनेने खडबडून जागे झालेल्या तामिळनाडू सरकारने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना त्यांच्याकडील रक्तसाठ्याची तपासणी करण्याचे व एड्सग्रस्तांचे रक्त त्यांच्या संग्रही नसल्याची खात्री करण्याचे आदेश दिले आहेत. ही महिला व तिच्या पतीने या प्रकरणी सत्तूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व डॉक्टर, नर्स तसेच रक्तपेढीच्या कर्मचाºयांवर कारवाईची मागणी केली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title:  Prevention of AIDS in pregnant woman due to contaminated blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.