दिल्लीमध्ये आप-काँग्रेस आघाडीची शक्यता मावळली 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 08:37 PM2019-04-17T20:37:11+5:302019-04-17T20:50:28+5:30

भाजपाला रोखण्यासाठी दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. आता आम आदमी पक्ष दिल्ली आणि हरियाणामधील सर्व जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.

The possibility of AAP-Congress alliance in Delhi is end | दिल्लीमध्ये आप-काँग्रेस आघाडीची शक्यता मावळली 

दिल्लीमध्ये आप-काँग्रेस आघाडीची शक्यता मावळली 

Next

नवी दिल्ली - भाजपाला रोखण्यासाठी दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. आता आम आदमी पक्ष दिल्ली आणि हरियाणामधील सर्व जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.  

आपचे नेते संजय सिंह म्हणाले की, भाजपाला रोखण्यासाठी आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी तयार होतो. मात्र आमच्यासोबत आघाडी करण्याची काँग्रेसची मनस्थिती आहे असे वाटत नाहीत. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करूनही जागावाटपाबाबत एकमत होऊ शकले नाही. आम्ही दिल्लीमध्ये 4-3 फॉर्म्युल्यावर आम्ही राजी झालो होतो, मात्र काँग्रेस वाटाघाडी करण्याची मन:स्थिती दाखवली नाही. तसेच हरियाणासाठी आम्ही 6-3-1 चा फॉर्म्युला दिला होता. मात्र गुलाम नबी आझाद आणि हुड्डा यांची वक्तव्ये पाहता त्यांची आघाडी करण्याची इच्छा आहे असे, वाटत नाही. 





 यावेळी आप आणि काँग्रेस यांच्यात आघाडी न होणे ही दु:खद बाब असल्याचेही संजय सिंह म्हणाले. काँग्रेस आणि आपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीत आघाडीसाठी चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांमध्ये पंजाब, हरिणाया आणि चंदिगडमधील मिळून 18 जागांसाठी आघाडीसाठी प्रयत्न सुरू होते. 

Web Title: The possibility of AAP-Congress alliance in Delhi is end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.