राजकीय पक्षांनी EVMचा फुटबॉल बनवलाय, मुख्य निवडणूक आयुक्तांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 08:35 PM2019-03-05T20:35:51+5:302019-03-05T20:36:32+5:30

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी राजकीय पक्षांकडून इव्हीएमवर घेण्यात येत असलेल्या संशयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Political parties have maked football of EVM's - Chief Election Commissioner | राजकीय पक्षांनी EVMचा फुटबॉल बनवलाय, मुख्य निवडणूक आयुक्तांची नाराजी

राजकीय पक्षांनी EVMचा फुटबॉल बनवलाय, मुख्य निवडणूक आयुक्तांची नाराजी

जम्मू - गेल्या काही काळापासून मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या इव्हीएमवर सातत्याने संशय घेतला जात आहे. दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी राजकीय पक्षांकडून इव्हीएमवर घेण्यात येत असलेल्या संशयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय पक्षांनी इव्हीएमचा फुटबॉल बनवून ठेवला आहे, असे सुनील अरोडा यांनी म्हटले आहे. 

निवडणूक आयोगाचे पथक मंगळवारी जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अरोडा यांनी इव्हीएमवर संशय घेणाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली. ''काही महिन्यांपूर्वी कर्नाटकबरोबरच इतर पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे निकाल लागले. मी सांगताना क्षमा मागतो, पण इव्हीएमचा फुटबॉल बनवून ठेवला आहे. निकाल एक्स लागला तर इव्हीएम चांगल्या आणि निकाल वाय लागला तर इव्हीएम खराब, असे म्हटले जाते,''असे सुनील अरोडा म्हणाले. 





 इव्हीएम मतदान करत नाही. तर तुम्ही आम्ही मतदान करतो. त्यामुळे इव्हीएमच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य ठरणार नाही. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा इव्हीएमवर शंका घेतल्या जातात,'' अशी खंतही मुख्य निवडणूक आयुक्तांनी व्यक्त केली. 





 गेल्या काही वर्षांपासून राजकीय पक्षांकडून इव्हीएमवर  सातत्याने शंका घेण्यात येत आहे. तसेच निवडणुका इव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणीही सातत्याने होत आहे. 

Web Title: Political parties have maked football of EVM's - Chief Election Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.