ठळक मुद्देअशोक कुमार याचे रोहटक येथील वकील मोहित वर्मा यांनी सांगितले की, अशोक कुमार यास या प्रकरणातील खºया गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी बळीचा बकरा बनवण्यात आले आहे.

रोहटक : गुरगाव येथील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या बसचा वाहक अशोक कुमार याने मी, माझा छळ करणे आणि बदनामी केल्याबद्दल हरियाणाचे पोलीस आणि रायन इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनावर खटला दाखल करणार आहे, असे शुक्रवारी सांगितले. 
अशोक कुमार यास याच शाळेतील प्रद्मुम्न ठाकूर (वय ८) याची हत्या आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. अशोक कुमार याचे रोहटक येथील वकील मोहित वर्मा यांनी सांगितले की, अशोक कुमार यास या प्रकरणातील खºया गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. ठाकूरच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) याच शाळेत अकरावीत शिकणाºया मुलाला अटक केल्यानंतर अशोक कुमार याने खटला दाखल करणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्याला अटक केल्यामुळे प्रद्युम्न ठाकूरच्या हत्येला वेगळेच वळण मिळाले व शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेस आला. ८ सप्टेंबर रोजी ठाकूर शाळेच्या स्वच्छतागृहात गळा कापलेल्या स्थितीत आढळला होता. सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट सादर झाला, की आम्ही पोलीस आणि शाळा व्यवस्थापनावर व्यापक स्वरूपाची बदनामी केल्याबद्दल खटले दाखल करणार आहोत, असे वर्मा म्हणाले. वर्मा म्हणाले की, अशोक कुमार याचा त्याने जो गुन्हा केलाच नाही तो प्रसारमाध्यमांसमोर कबूल करावा यासाठी पोलिसांनी ड्रग देऊन छळ केला. पोलिसांनी गचाळपणे चौकशी केली, हे स्पष्टच आहे. अशोक कुमार याने प्रद्युम्नला ठार मारले असेल, असा कोणताही उद्देश सीबीआयला सापडलेला नाही. त्यांनी त्या हत्येबद्दल अकरावीत शिकणाºया विद्यार्थ्याला अटक करून हत्येचा हेतू सिद्ध केला आहे, असे वर्मा म्हणाले.
वर्मा म्हणाले की, हरियाणा पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेºयातील चित्रण अस्पष्ट आहे, असे सांगून फेटाळून लावले होते तेच पाहून सीबीआयने वरील निष्कर्ष काढला आहे. प्रत्येक गोष्ट पोलिसांनी ‘व्यवस्थित तयार’ करून घेतली होती. त्यांनी निर्दोष व्यक्तीला आरोपी बनवले. पोलिसांवर कोणी दबाब आणला याचीच चौकशी झाली पाहिजे. अशोक कुमार याने खून केल्याचा पुरावा मिळालेला नाही; परंतु त्याला अजून निर्दोषही ठरवण्यात आलेले नाही, असे सीबीआयने म्हटले.