तू मेला नाहीस तर शाळा लवकर कशी सुटेल... सहावीच्या मुलीने पहिलीतल्या मुलाला भोसकलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 01:33 PM2018-01-18T13:33:11+5:302018-01-18T13:44:34+5:30

शाळेत प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आपआपल्या वर्गात जात होते. पहिल्या इयत्तेत शिकणारा हृतिक हा देखील वर्गात जाण्याच्या तयारीत होता. परंतू वर्गात जात असताना मध्येच सातवीत शिकणारी एक मुलगी ह्रतिकजवळ गेली.

police recognised 6th class girl who attack on class one student | तू मेला नाहीस तर शाळा लवकर कशी सुटेल... सहावीच्या मुलीने पहिलीतल्या मुलाला भोसकलं 

तू मेला नाहीस तर शाळा लवकर कशी सुटेल... सहावीच्या मुलीने पहिलीतल्या मुलाला भोसकलं 

Next

लखनऊ: शाळा लवकर सुटावी म्हणून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे हा गंभीर प्रकार घडला आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी  असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. किंग जॉर्ज्स मेडिकल युनिव्हर्सिटीतील ट्रॉमा सेंटरमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
मंगळवारी ब्राईटलँड इंटर स्कूल या शाळेत प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आपआपल्या वर्गात जात होते. पहिल्या इयत्तेत शिकणारा हृतिक शर्मा हा देखील वर्गात जाण्याच्या तयारीत होता. परंतू वर्गात जात असताना मध्येच सातवीत शिकणारी एक मुलगी ह्रतिकजवळ गेली. तुझं नाव काय, तुला शिक्षकांनी बोलावले आहे, असे सांगत त्या मुलीने ह्रतिकला काही कळायच्या आत त्याच्या तोंडावर हात ठेवून खेचत त्याला शाळेतील स्वच्छता गृहात नेले.  मुलगा ओरडायला लागल्यावर तिने त्याच्या तोंडात कापडाचा बोळा घातला. ओढणीच्या सहाय्याने त्याचे हातपाय बांधले. दरवाजा बंद करुन तिने तीक्ष्ण हत्याराने ह्रतिकच्या पोटावर आणि छातीवर वार करायला सुरूवात केली. रक्तबंबाळ झालेल्या ह्रतिकला बाथरुममध्येच कोंडून ती पळून गेली. ह्रतिकचा आवाज ऐकून शाळेतील काही कर्मचा-यांनी स्वच्छता गृहाचा दरवाजा उघडला. रक्तबंबाळ अवस्थेत ह्रतिक पडला होता. त्याचे हातपाय बांधले होते, तोंडात कापडाचा बोळा कोंबला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची प्रकृती सध्या स्थिर आहे. 
शाळा प्रशासनाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती आहे. पण ह्रतिकवर ज्या रुग्णालयात उपचार सुरु होते तिथून ही माहिती प्रसारमाध्यमांना समजली आणि हे प्रकरण उघड झाले. पोलिसांनीही तातडीने याची दखल घेत मुलाचा जबाब घेतला. तसेच शाळा प्रशासनाला नोटीसही बजावली आहे. 
विद्यार्थिनीचा फोटो पाहून जखमी विद्यार्थ्याने तिची ओळख पटवली आहे.  'बॉयकटवाल्या दीदी'ने टॉयलेटमध्ये आपल्यावर चाकूने हल्ला केल्याचं त्याने सांगितलं. तू मेला नाहीस तर शाळा लवकर कशी सुटेल असं  'बॉयकटवाली दीदी' हल्ला करताना म्हणत होती अशी माहिती शुद्धीवर आल्यानंतर हृतिकने घडल्या प्रकाराबाबत दिली. 
 

Web Title: police recognised 6th class girl who attack on class one student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.