यूपी पोलिसांनी 24 तासात केले चार मोठे एनकाऊंटर, अनेक गुन्हेगार अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 11:30 AM2018-02-03T11:30:49+5:302018-02-03T11:32:33+5:30

उत्तर प्रदेशात वाढणाऱ्या गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी गुन्हेगारांविरोधात पोलीस आणि एसटीएफच्या संयुक्त पथकाने एनकाऊंटर जारी केलं आहे

up police encounter continues on friday muzaffarnagar, noida and kannauj of uttar pradesh | यूपी पोलिसांनी 24 तासात केले चार मोठे एनकाऊंटर, अनेक गुन्हेगार अटकेत

यूपी पोलिसांनी 24 तासात केले चार मोठे एनकाऊंटर, अनेक गुन्हेगार अटकेत

Next

लखनऊ- उत्तर प्रदेशात वाढणाऱ्या गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी गुन्हेगारांविरोधात पोलीस आणि एसटीएफच्या संयुक्त पथकाने एनकाऊंटर जारी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईत अनेक अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात यश आलं आहे. मुझफ्फरनगर, नोएडा आणि मेरठमध्ये शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या कारवाईनंतर संध्याकाळी उशिरा कनोजमध्ये पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये झटापट झाली. यामध्ये एक गुन्हेगार जखमी झाल्याचं वृत्त आहे. दोन दिवसाआधी कनोजमध्यो पोलिसांनी 60 लाख बॅटरी आणि एक ट्रकसह 10 जणांना पकडलं होतं. चित्रकूटमध्येही कारवाई झाल्याची माहिती आहे. 

याआधी उत्तर प्रदेश पोलीस आणि एसटीएफच्या पथकाने बक्षिस असलेला कॉन्ट्रॅक्ट किलर इंद्रपालला मुझफ्फरनगर एनकाऊंटरमध्ये मारलं होतं. यूपी पोलिसांनी ट्विटरवरून यांसदर्भातील माहिती दिली. गोळीबार सुरू असताना इंद्रपालला गोळी लागली. या गोळीबारादरम्यान एसटीएफचे एसआयही जखमी झाले होते. इंद्रपालवर हत्या आणि दरोड्याच्या तीन डझन केसेसे दाखल असल्याचं समोर आलं. मेरठमध्ये 10 हजार रूपये बक्षिस असणाऱ्या फकरूद्दीन यालाही पोलिसांनी पकडलं. चकमकीत जखमी झालेल्या फकरूद्दीनला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. फकरूद्दीनवर अवैध हत्यार बनविण्याचा आरोप आहे. 
नोएडाच्या टीपीनगर भागातून पोलिसांनी दोन गुन्हेगारांना अटक केली. या दोघांनी चोरलेल्या कार, लॅपटॉप, मोबाइल फोन, काडतूसं पोलिसांनी जप्त केली. अंकित शर्मा आणि राहुल अशी या दोघांची नावं असून या दोघांवर दहा-दहा हजरा रूपयांचं बक्षिस होतं. 

कायदा सुव्यवस्था सुधारण्याचे आदेश

उत्तर प्रदेशात भाजपा सत्तेत आल्यानंतर तेथिल कायदा व सुव्यवस्था सुधारण्याचे आदोश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना दिले होते. त्यानंतर पोलिसांकडून एनकाऊंटर सुरू करण्यात आलं. गुन्हेगारांवर भारी पडच एनकाऊंटर करण्यात पश्चिम उत्तर प्रदेश पोलीस नंबर वनवर होती. 

Web Title: up police encounter continues on friday muzaffarnagar, noida and kannauj of uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.