कॉलेज विद्यार्थिनीवर पाच तरुणांचा आळीपाळीनं सामूहिक बलात्कार, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 05:25 PM2019-07-04T17:25:38+5:302019-07-04T17:26:26+5:30

एका कॉलेज विद्यार्थिनीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

police arrested five teenagers for allegedly abducting and sexually harassing their classmate | कॉलेज विद्यार्थिनीवर पाच तरुणांचा आळीपाळीनं सामूहिक बलात्कार, व्हिडीओ व्हायरल

कॉलेज विद्यार्थिनीवर पाच तरुणांचा आळीपाळीनं सामूहिक बलात्कार, व्हिडीओ व्हायरल

Next

मंगळुरू: एका कॉलेज विद्यार्थिनीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात कर्नाटकातील मंगळुरूतल्या पुत्तुर जिल्ह्यात एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या पाच तरुणांना अटक करण्यात आली आहे. सर्वच आरोपींचं वय 19 वर्षं आहे. त्यांच्याकडे बलात्कार करतानाचा व्हिडीओसुद्धा असून, तो पोलिसांनी जप्त केला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून ते तरुण पीडित मुलीला ब्लॅकमेल करत होते.

घटनेच्या चार महिन्यांनंतर या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान घडली होती. ते आरोपी पीडितेबरोबर कॉलेजमध्ये शिकत असल्याचाही जबाब पीडित मुलीनं दिला आहे. घटनेच्या दिवशी सुनीलनं पीडितेला फोन करून भेटण्यास बोलावले. त्यानंतर सुनील आणि इतर चार आरोपींनी त्या तरुणाचं अपहरण करत तिला निळ्या वाहनातून घेऊन गेले.

एका निर्जनस्थळी नेऊन त्या पाच जणांनी तरुणीवर आळीपाळीनं बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओही बनवला. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पोलिसांनी या व्हायरल व्हिडीओवरून गुन्हा नोंदवला. प्रकरण पुत्तुल पोलीस स्टेशनमध्ये असून, आरोपींना पकडण्यासाठी दोन टीम बनवण्यात आल्या होत्या. पोलीस अधीक्षक बीएम लक्ष्मी म्हणाल्या, आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता, अॅट्रॉसिटी कायदा आणि आयटी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 

Web Title: police arrested five teenagers for allegedly abducting and sexually harassing their classmate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.