Moscow Terrorist Attack: “मॉस्को दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध, भारत रशियाच्या पाठिशी ठामपणे उभा”: PM नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 09:42 AM2024-03-23T09:42:58+5:302024-03-23T09:44:05+5:30

Moscow Terrorist Attack: मॉस्को हल्ल्याने आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. टेलिग्राम चॅनलवर जारी केलेल्या वक्तव्यामध्ये हल्लेखोर सुरक्षितरित्या त्यांच्या घरी परतले आहेत, असे म्हटले आहे.

pm narendra modi said we strongly condemn the terrorist attack in moscow india stands with russia govt and the people | Moscow Terrorist Attack: “मॉस्को दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध, भारत रशियाच्या पाठिशी ठामपणे उभा”: PM नरेंद्र मोदी

Moscow Terrorist Attack: “मॉस्को दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध, भारत रशियाच्या पाठिशी ठामपणे उभा”: PM नरेंद्र मोदी

Moscow Terrorist Attack: रशियाची राजधानी मॉस्कोमधील एका कॉन्सर्ट हॉलवर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. पाच हत्यारबंद हल्लेखोरांनी केलेल्या बेछूट गोळीबारात आतापर्यंत सुमारे ६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, १४५ हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. इस्लामिक स्टेट ग्रुप या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही रशियाच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, असे म्हटले आहे.

मॉस्को येथे एका म्युझिक कॉन्सर्टसाठी हजारोच्या संख्येने लोक जमले होते. सहा ते सात हल्लेखोरांनी अचानक अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात अनेकजण जागीच ठार झाले. हल्लेखोर तब्बल १५ ते २० मिनिटे गोळीबार करत होते. यानंतर अचानक कॉन्सर्ट हॉलमध्ये आग लागली आणि स्फोटांचा आवाज झाला, अशी माहिती देण्यात आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट करत या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. 

मॉस्को दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध

मॉस्को येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. आमच्या प्रार्थना पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या कठीण आणि दु:खाच्या प्रसंगी भारत सरकार आणि रशियन फेडरेशनच्या लोकांच्या पाठीशी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. कॉन्सर्ट हॉलमध्ये अजून काही लोक अडकल्याची भिती आहे. रशियन जवानांकडून बचावकार्य सुरू असून, काही जणांना सुखरूप बाहेर काढले जात आहे.

मॉस्कोतील म्युझिक कॉन्सर्टमध्ये ISIS कडून भीषण हल्ला; 60 जणांचा मृत्यू, 145 जखमी 

दरम्यान, रशियन वृत्तानुसार, हल्लेखोरांनी मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा वापर केला. कॉन्सर्ट हॉलमध्ये आग लावण्यात आली. सोशल मीडियावरील काही व्हिडिओमधून इमारतीवर धुराचे मोठे लोट दिसून येत होते. दहशतवादी हल्लेखोर सैनिकांच्या गणवेशात आले होते, असे सांगितले जात आहे. रशियन सैन्याने दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले, अशी माहिती रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे.

 

Web Title: pm narendra modi said we strongly condemn the terrorist attack in moscow india stands with russia govt and the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.