Police Commemoration Day : शहिदांच्या शौर्याच्या आठवणीने पंतप्रधान मोदी झाले भावूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 10:02 AM2018-10-21T10:02:23+5:302018-10-21T11:43:03+5:30

राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.  वेगवेगळ्या राज्यांमध्ये शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली.

pm modi gets emotional while paying tribute to martyrs on national police memorial event | Police Commemoration Day : शहिदांच्या शौर्याच्या आठवणीने पंतप्रधान मोदी झाले भावूक 

Police Commemoration Day : शहिदांच्या शौर्याच्या आठवणीने पंतप्रधान मोदी झाले भावूक 

Next

नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. वेगवेगळ्या राज्यांमध्ये शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांच्या शौर्याची आठवण काढताना पंतप्रधान मोदी काही क्षण भावूक झाले. दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातील (एनडीआरएफ) जवानांसाठी आता प्रत्येक वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त (23 जानेवारी) त्यांच्या नावे पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार असल्याची घोषणा केली. 


Live : पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, वर्षात दुसऱ्यांदा लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण

'आजचा दिवस त्या साहसी पोलीस जवानांच्या वीरगाथेचं स्मरण करण्याचा दिवस आहे, ज्या जवानांनी लडाखच्या बर्फाळ डोंगरांमध्ये पहिल्यांदा देशाच्या संरक्षणाचे काम करताना आपले बलिदान दिले. देशाच्या स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत कर्तव्याच्या मार्गावर चालणाऱ्या जवानांना माझे नमन' असे ही पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच मोदींनी शौर्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा गौरव केला.

15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी ही परंपरा मोडून आज वर्षातून दुसऱ्यांदा तिरंगा फडकवला आहे. कारण, 75 वर्षांपूर्वी म्हणजे 21 ऑक्टोबर 1943 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी 'आझाद हिंद सरकार'ची स्थापना केली होती. नेताजी सुभाष चंद बोस यांच्या नेतृत्वातील 'आझाद हिंद सरकार'च्या 75व्या जयंतीनिमित्त आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्यासहीत आझाद हिंद सेनेतील लाती राम आणि सुभाष चंद्र बोस यांच्या कुटुंबातील सदस्यदेखील सहभागी झाले आहेत. 


इतकेच नाही तर सुभाष चंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या आठवणी ताज्या करण्यासाठी पंतप्रधान मोदी अंदमान-निकोबार येथेही जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते सेल्युलर कारागृहाला भेट देणार आहेत. जेथे स्वातंत्र्यसाठी लढणाऱ्या सैनिकांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जायची. वेगवेगळ्या राज्यांमध्ये शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनीही शहिदांना आदरांजली वाहिली. 



 

Web Title: pm modi gets emotional while paying tribute to martyrs on national police memorial event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.