"लोकांना धाक दाखवून गप्प बसविण्यात आले", संदेशखालीमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 05:23 AM2024-04-14T05:23:30+5:302024-04-14T05:24:55+5:30

पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे अत्याचाराची अनेक प्रकरणे घडली असून, तिथे मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे.

People were silenced by intimidation human rights violations under the message in west bengal | "लोकांना धाक दाखवून गप्प बसविण्यात आले", संदेशखालीमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन

"लोकांना धाक दाखवून गप्प बसविण्यात आले", संदेशखालीमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे अत्याचाराची अनेक प्रकरणे घडली असून, तिथे मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे. तिथे काही जणांनी लोकांना धाकदपटशा करून गप्प बसण्यास भाग पाडले, असे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने शनिवारी म्हटले आहे. 

अत्याचार रोखण्यासाठी प्रशासनाने वेळीच कारवाई केली नाही असे संदेशखालीसंदर्भातील आयोगाने म्हटले आहे. आयोगाच्या पथकाने संदेशखालीत  येथे जाऊन तेथील स्थितीची पाहणी केली होती. आयोगाने सांगितले की, संदेशखालीमध्ये ज्यांच्यावर अत्याचार झाला, ते दडपणाखाली वावरत होते. आपण तक्रार केल्यास सूड उगवला जाईल असे त्यांना वाटत होते. 

निदर्शनानंतर कारवाई
अत्याचारांविरोधात गावकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी निदर्शने करीत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर स्थानिक यंत्रणांनी कारवाईसाठी हालचाल केली, असेही आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. 

Web Title: People were silenced by intimidation human rights violations under the message in west bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.