जॉय राईड कोसळल्यानं दोघांचा मृत्यू; २७ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 12:33 PM2019-07-15T12:33:10+5:302019-07-15T12:34:18+5:30

पालिका आयुक्तांकडून अपघाताच्या चौकशीचे आदेश

Pendulum Ride Breaks Down at Ahmedabad Theme Park 2 Killed 27 Injured | जॉय राईड कोसळल्यानं दोघांचा मृत्यू; २७ जखमी

जॉय राईड कोसळल्यानं दोघांचा मृत्यू; २७ जखमी

Next

अहमदाबाद: अ‍ॅडव्हेंचर पार्कमधील जॉय राईड कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाल्याची घटना अहमदाबादमध्ये काल संध्याकाळी घडली. या अपघातात २७ जण जखमी झाले. यातील १४ जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. जॉय राईडमध्ये बिघाड झाल्यानं हा प्रकार घडला. सध्या या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली. 

जॉय राईड कोसळल्यानं मनाली राजवाडी (वय २४ वर्षे) आणि मोहम्मद जावेद (वय २२ वर्षे) यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील जखमींवर योग्य उपचार केले जात असल्याचं अहमदाबाद महापालिका आयुक्त विजय नेहरा यांनी सांगितलं. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम या घटनेची चौकशी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जॉय राईडचा मुख्य पाईप तुटल्यानं हा अपघात झाल्याचं मुख्य अग्निशमन अधिकारी एम. एफ. दस्तूर यांनी म्हटलं. 

गेल्याच महिन्यात चेन्नईतदेखील अशीच घटना घडली होती. कांचीपुरम जिल्ह्यातल्या किशकिंता थीम पार्कमध्ये जायंट व्हिल कोसळलं होतं. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. तर ९ जण जखमी झाले होते. 
 

Web Title: Pendulum Ride Breaks Down at Ahmedabad Theme Park 2 Killed 27 Injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात