संसदेत शिवसेना खासदारांची नागरी उड्डाणमंत्र्यांना धक्काबुक्की?

By admin | Published: April 6, 2017 01:17 PM2017-04-06T13:17:43+5:302017-04-06T13:39:09+5:30

संसदेतमध्ये शिवसेनेच्या खासदारांनी नागरी उड्डाणमंत्री गजपती राजू यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांना घेराव घातला.

In the Parliament, the Shiv Sena MPs blow a civil flight? | संसदेत शिवसेना खासदारांची नागरी उड्डाणमंत्र्यांना धक्काबुक्की?

संसदेत शिवसेना खासदारांची नागरी उड्डाणमंत्र्यांना धक्काबुक्की?

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 6 - शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड विमानातील चप्पलमार प्रकरणानंतर आज संसदेत दाखल झाले होते. चप्पलमार प्रकरणावरुन संसदेतही गदारोळ पाहायला मिळाला.  यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावं लागलं. दरम्यान, गायकवाड यांनी सभागृहात माझ्यासोबत अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली. तपास न करताच माझी मीडिया ट्रायल सुरू करण्यात आली, ही बाब अन्यायकारक असल्याचे त्यांनी संसदेत म्हटले. 
 
या सर्व गोंधळादरम्यान, शिवसेनेच्या खासदारांनी नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपति राजू यांच्याविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. शिवसेना खासदारांनी गजपती राजूंनी घेराव घातला. व त्यांना धक्काबुक्कीही करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
 
या सर्व प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह , स्मृती इराणी यांच्यासहीत अन्य मंत्र्यांनी मध्यस्थी केली. 
 
हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा कसा दाखल होऊ शकतो?
हवाई प्रवास माझा घटनात्मक अधिकार आहे. शिवाय, दिल्ली पोलीस या प्रकरणात माझ्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा कसे दाखल करू शकतात, असा प्रश्नही रविंद्र गायकवाड यांनी संसदेत उपस्थित केला. मी वारंवार तिकीट बुक करुन रद्द केली अशा बातम्या येत आहेत. मी गेलोच नाही तर तिकीट बुक कसे होईल?, अशी माहितीही गायकवाड यांनी संसदेत सांगितली. शिवाय, माझा गुन्हा काय याची चौकशी न करताच माझ्याविरोधात मीडिया ट्रायल सुरू करण्यात आली, असंही गायकवाड म्हणाले. 
संसदेत गोंधळ
शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांच्या निवेदनानंतर शिवसेना खासदारांनी लोकसभेत गोंधळ घातला.  यावेळी त्यांनी नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपति राजू यांना घेराव घालत धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न  केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी राजनाथ सिंह, स्मृती इराणी आणि अन्य सदस्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती निवळली.
 

Web Title: In the Parliament, the Shiv Sena MPs blow a civil flight?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.