पनामा पेपर्सवरून मोदी सरकारवर शरद यादवांनी चढवला हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 08:42 PM2017-07-30T20:42:23+5:302017-07-30T20:42:32+5:30

भाजपाशी हातमिळवणी केल्यानंतर पक्षाचे राज्यसभेतील ज्येष्ठ नेते शरद यादव मौन बाळगून होते. मात्र रविवारी एका ट्विटद्वारे मोदी सरकारवर त्यांनी हल्ला चढवला आहे.

panaamaa-paeparasavarauuna-maodai-sarakaaravara-sarada-yaadavaannai-cadhavalaa-halalaa | पनामा पेपर्सवरून मोदी सरकारवर शरद यादवांनी चढवला हल्ला

पनामा पेपर्सवरून मोदी सरकारवर शरद यादवांनी चढवला हल्ला

Next

सुरेश भटेवरा
नवी दिल्ली, दि. 30 - नितीशकुमारांच्या नेतृत्वाखाली जद(यु) बिहारच्या महाआघाडीतून बाहेर पडला. भाजपाशी हातमिळवणी केल्यानंतर पक्षाचे राज्यसभेतील ज्येष्ठ नेते शरद यादव मौन बाळगून होते. मात्र रविवारी एका ट्विटद्वारे मोदी सरकारवर त्यांनी हल्ला चढवला आहे. मोदी सरकारची हजेरी घेत शरद यादव म्हणतात, ‘पनामा पेपर्समध्ये ज्या भारतीय नावांचा उल्लेख आहे, त्यापैकी एकालाही मोदी सरकारने पकडलेले नाही. परदेशात दडवलेले काळे पैसे परत आणणार ही मोदी सरकारची मुख्य घोषणा होती त्या दिशेने केवळ निवडक कारवाईच आजपर्यंत देशात झाल्याचे चित्र दिसते आहे. शरद यादव पुढे म्हणतात की विविध सेवांच्या नावाखाली जनतेकडून विविध प्रकारचे सेस सरकार वसुल करीत आहे. तथापि या रकमेतून कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय बदल झाल्याचे चित्र देशात दिसत नाही. असफल ठरलेली पीक विमा योजना याचे ठळक उदाहरण आहे. केवळ खासगी कंपन्यांना नफा मिळवून देण्याची व्यवस्था या योजनेतून झाली आहे’.
बिहारमधील महाआघाडीतून जद (यु) ने तडकाफडकी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यापासून शरद यादव मनोमन नितीशकुमारांवर नाराज आहेत, याची उघड चर्चा राजधानीत सर्वत्र सुरू आहे. हा निर्णय पक्षाने घेतला त्या दिवशी सायंकाळी दिल्लीत आपल्या निवासस्थानी जद (यु)चे नेते आणि कार्यक र्त्यांची शरद यादवांनी एक बैठकही बोलावली होती. दरम्यान अर्थमंत्री अरूण जेटली आणि नितीशकुमारांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केल्याचे समजले. यानंतर रविवारपर्यंत शरद यादव गप्प होते. विशेषत: नितीशकुमारांच्या विरोधात एक शब्दही ते बोललेले नाहीत, तथापि भाजपाशी हातमिळवणी करण्याच्या पक्षाच्या निर्णयाबाबत ते अजूनही अस्वस्थ असावेत असे त्यांच्या देहबोलीवरून जाणवते. शरद यादवांच्या ताज्या मन:स्थितीचा अंदाज घेत शनिवारी शरद यादवांशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून लालूप्रसाद यांनी त्यांना राष्ट्रीय जनता दलात प्रवेश करण्याचे त्यांना आवाहन केले.
व्टीटरवर लालूप्रसाद म्हणाले : देशात गरीब, वंचित व शेतकरी वर्गावर संकट कोसळले आहे. या आपत्तीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी एक जोरदार आंदोलन उभे करावे लागेल. देशाला पुन्हा एका नव्या संघर्षाची आता गरज आहे, शरदभाई त्यासाठी तुम्ही या. पूर्वीही आपण बरोबर संघर्ष केला आहे. लाठया खाल्ल्या आहेत. पुन्हा एकदा सारे मिळून या दक्षिणपंथी हुकुमशाहीला नेस्तनाबूत करू.
भाजपबरोबर नवे सरकार बनवतांना नितीशकुमार सर्वांचे समाधान करू शकलेले नाहीत. साहजिकच बिहारच्या नव्या आघाडीतह सरकारच्या विरोधात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. मंत्र्यांच्या शपथविधीच्या अगोदर माजी मुख्यमंत्री व ‘हम’ पक्षाचे नेते जीतनराम मांझी यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दात जाहीरपणे बोलून दाखवली. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे प्रमुख केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षालाही नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.
 

Web Title: panaamaa-paeparasavarauuna-maodai-sarakaaravara-sarada-yaadavaannai-cadhavalaa-halalaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.