पाकिस्तानवर 'सायबर स्ट्राईक'; भारतीय हॅकर्सकडून 200हून अधिक साईट हॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 10:30 AM2019-02-18T10:30:29+5:302019-02-18T11:16:22+5:30

पुलवामा हल्ल्याच्या चार दिवसांनंतरच भारतीय हॅकर्सनं पाकिस्तानवर मोठा सायबर हल्ला केला आहे.

pakistani websites hacked pulwama attack crpf jawans | पाकिस्तानवर 'सायबर स्ट्राईक'; भारतीय हॅकर्सकडून 200हून अधिक साईट हॅक

पाकिस्तानवर 'सायबर स्ट्राईक'; भारतीय हॅकर्सकडून 200हून अधिक साईट हॅक

नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्याच्या चार दिवसांनंतरच भारतीय हॅकर्सनं पाकिस्तानवर मोठा सायबर हल्ला केला आहे. भारतीय हॅकर्सच्या एका गटानं पाकिस्तानच्या जवळपास 200हून अधिक वेबसाइट्स हॅक केल्यात आहेत. टीम आय-क्रूद्वारा हॅक करण्यात आलेल्या या वेबसाइट्स ओपन केल्यास पुलवामा हल्ल्यातील भारतीय शहिदांना श्रद्धांजली वाहिल्याचं निदर्शनास येतं आहे आणि पेटती मेणबत्तीही नजरेस पडत आहे. तसेच भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं तिरंग्याच्या रंगांमध्ये उडताना दिसत आहेत.

पेजवर लिहिलं आहे की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना आमची श्रद्धांजली. तसेच याशिवाय असाही मेसेज लिहिण्यात आला आहे की, 14/02/2019चा हल्ला आम्ही विसरणार नाही. पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्यात ज्या जवानांनी प्राणांची आहुती दिली, त्या वीर जवानांना आम्ही आदरांजली वाहतो. आम्हाला माफ करा ?, आम्ही विसरून जाऊ ?, भारत हा हल्ला कधीही विसरणार नाही. तुमच्यानुसार, देशभक्ती-युद्ध-जिहाद- शिट, असाही मेसेज या हॅक करण्यात आलेल्या पेजवर पाहायला मिळतोय. पाकिस्तानी सायबर जगतातला हा सर्वात मोठा हल्ला आहे. तत्पूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचीही वेबसाइट हॅक करण्यात आली होती. 

पुलवाम्यात 14 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका बसवर हल्ला केला होता. त्यात आपले 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली होती. त्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी जोरदार सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. व्यापाऱ्यांनीही आज बंदची घोषणा दिली आहे. 

Web Title: pakistani websites hacked pulwama attack crpf jawans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.